logo

सातारा : कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुविधा द्याव्यात अन्यथा आंदोलन

सातारा : सातारा नगरपालिका विविध आस्थापनामध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचारी यांना किमान वेतन कायद्यानुसार मासिक पगार द्या. पी. एफ. कायद्यानुसार खात्यात मासिक पी.एफ जमा करावा.यासोबत आरोग्यविमा व इतर सुविधा तात्काळ दिल्या जाव्यात अन्यथा राज्यातील समविचारी कामगार संघटना यांच्या सोबतीने रयतक्रांती जनरल कामगार संघटना यांच्यावतीने व्यापक आंदोलन करण्यात येईल असा इशारा कामगार नेते गणेश ( आबा) वाघमारे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. नगरपालिका प्रशासनाला दिले कंत्राटी कामगार यांच्या न्याय मागण्याचे निवेदन देण्यात आले.

22
2146 views