logo

बुलढाणा एलसीबीचे ए एसआय लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक



बुलढाणा एलसीबीचे एएसआय लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक
Aima news network........
बुलढाणा.23 मे बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील एएसआय गजानन माळी यांना अकोला एसीबीने लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. रेती तस्करीच्या हप्त्यासाठी हे प्रकरण होते. मलकापूर येथील एएसाय गजानन माळी 14 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. त्यासोबत अजून एका पोलिस कर्मचाऱ्याचा सहभाग आहे का? सदर पोलिस कर्मचारी आज केवळ साहेबांसोबत गेला होता, असे कळते. त्याचा लाच मागण्याशी कुठलाच संबंध नसल्याचे कळते. अर्थात याबाबत चौकशी सुरू आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरची कारवाई अकोला एसीबीचे उप अधीक्षक बाहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

105
5419 views