logo

एकतर्फी निर्णयामुळे शेतकरी आक्रमक; अखेर तहसीलदार उरण यांच्या आदेशाने स्थगिती

पोल्ट्री व्यवसायासाठी मोलमजुराचे घर तोडून रस्ता देण्याचा अजब प्रकार समोर

उरण : राज भंडारी

तालुक्यातील मोठी जुई येथील रमेश बाळाभाऊ कदम यांच्या सर्व्हे नंबर ८/२१ या जागेतून कोणत्याही प्रकारची ग्रामपंचायत नोंद नसताना १२ फुटी रस्ता एका पोल्ट्री धारकाला देण्यात यावा असा आदेश तहसीलदार उरण यांनी दिला. मात्र प्रत्यक्ष ग्रामपंचायतीमध्ये सदर रस्ता आहॆ किंवा नाही, वाहिवाट आहॆ किंवा नाही याची खातरजमा न करता शेतकऱ्यांच्या जमिनीतून १२ फुटी रस्ता जबरीने देण्याचा एकतर्फी आदेश बजावला. प्रत्यक्षात सदर जागेत एका गरीब आणि गरजू महिलेला ही जमीन रमेश कदम यांनी विकल्यानंतर तीचे घराचे काम बंद पाडून त्याठिकाणी रस्ता देण्याचा अजब प्रकार तहसीलदार उरण यांनी केल्यामुळे या कामाबाबत रमेश कदम यांनी संशय व्यक्त केला.

उरण तहसीलमार्फत करण्यात आलेल्या एकतर्फी आदेशाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले. यावेळी मंडळ अधिकारी केशव मोहिते यांनी सदर पोल्ट्री धारकाला रस्ता देण्याच्या तहसीलदार उरण यांच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्त घेऊन दाखल झाले, मात्र ग्रामस्थांचा विरोध त्यांना मागच्या पावलाने जाण्यास भाग पाडले. यावेळी उरण पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी मात्र शेतकऱ्यांवरील अन्याय न पाहता त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. अखेर मंडळ अधिकारी केशव मोहिते यांनी तहसीलदार उरण यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून झाला प्रकार सांगितला असता, आपण पुन्हा याबाबत सुनावणी लावून सर्व शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून निर्णय देणार असल्याचे सांगितले.

या प्रकाराबाबत नेमकी शासनाची भूमिका काय? असा एकतर्फी आदेश का आणि कसा घेण्यात आला? यावर प्रसिद्धीमाध्यमांनी मंडळ अधिकारी केशव मोहिते यांना प्रतिक्रिया विचारल्या असता त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली, तसेच प्रसिद्धी माध्यमांना चित्रीकरण करण्यास देखील अटकाव केला. सदर आक्रमक झालेल्या प्रकाराला इतर पोलिसांनी समजुतीने शांत केले. यावेळी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारी योगिता चेतन पाटील हिने आपण चार वर्षे पैसे जमा करून सदर जागा विकत घेतली असून मी घर बांधायला घेतलं. मात्र याठिकाणी वारंवार पोलीस ठाण्यात मला बोलावून घराचं काम थांबविण्यासाठी सांगितलं जातं, त्यामुळे त्यांनी आता सरकारकडे न्यायाची विनंती केली आहॆ.

22
1370 views