logo

नायब तहसीलदार जांभुळकर साहेब व नगरपरिषद उपमुख्यधिकारी पूजा लांजेवार मॅडम यांना मनसेच्या वतीने, खेळाडू वर्गाचा वतीने व सामान्य नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले..

तुमसर :- आज २२ मे २०२५. ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नेहरू मैदानाचा विषयावर तहसील कार्यालय व नगरपरिषद येथे निवेदन देण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कुबेर नगरी, व तांदूळ नगरी म्हणून प्रसिद्ध असलेला तालुका तुमसर शहर येथील काही खेळाडू राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, स्तरावर प्रतिनिधित्व केलेले असून सुद्धा इथे मैदानी सरावा करीता, व शारीरिक व्यायामाकरिता असा तुमसर शहरातील एक मात्र मैदान म्हणजे "भारतरत्न अटल बिहारी बाजपेयी तालुका क्रीडा संकुल तुमसर", म्हणजे नेहरू मैदान आणि त्या मैदानात संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. जागोजागी खड्डे पडलेले आहेत इथे सर्वसामान्य नागरिकांना व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गोरगरीब तरुणांना मैदानी सराव करीत असतांना त्रास सहन करावा लागतो. मुलं सराव करित असताना मैदानावर दुचाकी व चार चाकी यांची ये-जा सुरूच असते, एक - दोन दा चार चाकी आणि दुचाकिंनी एकक्सिडन्ट झालेला आहे. या आधी निवेदन देऊन शुद्धा प्रशासनाने दुर्लक्ष केलेला आहे. मग मुलांची प्रॅक्टिस करताना धूळ त्यांच्या नाकामध्ये जाते भविष्यामध्ये त्यांना श्वसनाच्या आजार सुद्धा होऊ शकतो आणि त्यांची सरावाची एकाग्रता भंग होते कधी पाऊस आल्यावर धावण्याकरिता रोडावर जातात आणि त्यांच्या पायाला दुखापत होते, किंवा कित्येकदा अपघात सुद्धा झालेले आहेत. कुणाचा हात तुटलेला आहे, कुणाचा पाय तूटलेला आहे, आणि मग त्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या स्वप्न अयशस्वी/अपयशी ठरतो. आज नायब तहसीलदार जांभुळकर साहेब व नगरपरिषद उपमुख्यधिकारी पूजा लांजेवार मॅडम यांना मनसेच्या वतीने, खेळाडू वर्गाचा वतीने व सामान्य नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे की, लवकरात लवकर मैदानाचे लेवली कारण करण्यात यावा, आणि धावण्याकरिता एक धावपट्टी आखण्यात यावी. यावेळी मनसे शहर अध्यक्ष निखिल कटारे, उपशहर अध्यक्ष पुष्पक त्रिभुवनकर तालुका सचिव दिपक सराटे तालुका संघटक रोशन ढोके विभाग अध्यक्ष मनीष गुर्वे विभाग अध्यक्ष विवेक डहरवाल सचिन कनोजे, जितू भवसागर, आकाश बडवाईक, अंकित पोबहे,आदित्य कोडवते, हर्षल कोकुडे, पूर्वेज पिथोळे, रघुनाथ झाडेकर लीलेश्वर रोकडे, जयश भुरे, रोनक झाडेकर, श्याम नागपुरे, भूषण अतकरी, इतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व खेळाडू वर्ग आदी उपस्थित होते.

17
1812 views