ग्रामविकास विद्यालय मेटपांजरा : तेजस्विनी वलके हिचा गौरव
ग्रामविकास विद्यालय मेटपांजरा : तेजस्विनी वलके हिचा गौरव
मेटपांजरा (ता. २०) :
ग्रामविकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मेटपांजरा येथील इयत्ता दहावीच्या परीक्षेत द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या कुमारी तेजस्विनी वलके हिचा घरी जाऊन शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
प्राचार्या डॉ. वैशाली टालाटूले मॅडम यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी तेजस्विनी हिला पुष्पगुच्छ देऊन तिच्या यशाचे कौतुक करण्यात आले.
डॉ. टालाटूले मॅडम यांनी तेजस्विनीच्या मेहनतीचे व सातत्यपूर्ण अभ्यासाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेच्या सर्व शिक्षकांनीही तिच्या यशाबद्दल अभिनंदन केले.
या सत्कार सोहळ्यात तेजस्विनीच्या पालकांचाही गौरव करण्यात आला. शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होऊन, इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा मिळेल, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले.