logo

*नाणेतज्ञ शेख दिलावर यांच्या ताज प्राचीन वास्तु संग्रहालयाला एक तप पूर्ण...*

*नाणेतज्ञ शेख दिलावर यांच्या ताज प्राचीन वास्तु संग्रहालयाला एक तप पूर्ण...*

*जागतिक संग्रहालय दिनानिमित्त,*
Aima media News network (सादिक शाह)
बुलढाणा नाणेतज्ञ शेख दिलावर यांच वय एकवीस वर्षे असून ते अंत्री खेडेकर, तालुका चिखली, जिल्हा बुलडाणा येथे राहतात.
२०१३ मध्ये शेख दिलावर हे पाचव्या वर्गाला असून एके वेळी गृहपाठ अपूर्ण असल्याने शिक्षकाने शिक्षा देण्यासाठी समोर बोलाऊन छडी देण्यापूर्वी विचारले गृहपाठ आज कसे अपूर्ण राहिले, शेख दिलावर म्हणाले सर पेन संपला होता शिक्षक म्हणतात कंपास दाखव, त्यानंतर कंपास पाहून थक्क झाले त्यात पै, पैसा, आना, आढळा याप्रकारची नाणी दिसायला लागली.
शिक्षक म्हणाले मला यातील दोन ते तीन नाणी दे, दिलावर म्हणाले घ्या पण काय करणार ते सांगा,
शिक्षक आपल्या वंशजांसाठी त्यांना दाखवण्याकरिता घेत होते.
त्याचवेळी दिलावर यांना उपक्रम सुचला की, अवघ्या देशाला नाण्यांसंधर्भात ज्ञान कोण देणार आणि प्रदर्शने कोण घडवून आणणार तर तो विडा शेख दिलावर यांनी उचलला. याप्रकारे शिक्षणासोबतच नाण्यांवर, काल्पनिक कागदपत्रांवर, वास्तूंवर अभ्यास करून त्यांनी संग्रह वाढविले.
शाळा, कॉलेज, सामाजिक ठिकाण, जयंत्या, सण समारंभ याप्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन आणि नियोजन करून भव्य दिव्य नाण्यांचे प्रदर्शने ते घडवितात.
या सामाजिक कार्यांची दखल घेत ग्लोबल ह्युमन राईट्स प्रोटेक्शन फोरम या तीन मंत्रालय मान्यता प्राप्त असलेल्या संस्थांद्वारे नाणेतज्ञ शेख दिलावर यांना साहित्य कला व सांस्कृतिक राष्ट्रीय पुरस्कार २०२४ दिल्ली येथे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी परदेशी चलन, २५०० वर्षांपासूनची प्राचीन नाणी, शिवकालीन नाणी यांच्या प्रदर्शनी आयोजित करण्यात येते. शेख दिलावर यांना करेंसी कलेक्टर अवॉर्ड २०२३, साहित्य कला व सांस्कृतिक पुरातन वास्तू राष्ट्रीय पुरस्कार २०२४, संत गाडगे बाबा समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार २०२४, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय पुरस्कार २०२५ याप्रकारची बरीच अशी पुरस्कारे मिळालेली आहेत.
दिलावर शेख यांच्या संग्रहातील निवडक नाणी म्हणजे कुशाण, गुप्त, चालुक्य, शुंग, सातवाहन, काबुल शाही सामंतदेव, मुघल, मराठा, ब्रिटिश आणि देश स्वातंत्र्य झाल्यानंतरील सर्व में नाणींचा समावेश आहे.
महत्वाचं म्हणजे चंद्रगुप्त मौर्य, सातकर्णी, शिवाजी महाराज, राजाराम महाराज, शाहू महाराज, अहिल्याबाई होळकर, टिपू सुलतान या सर्व राजे महाराजांची सोन्याची, चांदीची आणि तांब्याची नाणी शेख दिलावर यांच्या संग्रहालयात आहेत.
गणपतींची स्मारक असलेली इंडोनेशिया येथील वीस हजार रुपियाह ची नोट, भगवान गौतम बुद्ध यांचे स्मारक असलेली कोंबोडिया या देशाची शंभरची नोट, काल्पनिक कागदपत्रे, पोस्ट तिकिटे, अवजारे आणि बरेच काही दुर्मिळ नाणी व नोटा त्यांच्या संग्रही आहेत.
त्यांच्या या ताज प्राचीन वास्तु संग्रहालयाला एक तप अर्थात १२ वर्षे पूर्ण होत आहे, त्यानिमित्ताने नाणेतज्ञ शेख दिलावर यांच्यावर चोहीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जागतिक संग्रहालय दिनानिमित्त सर्व इतिहासप्रेमींना हार्दिक शुभेच्छा...

*नाणेतज्ञ शेख दिलावर, अंत्री खेडेकर*
*संपर्क ९३२२३९३२१९*

45
1172 views