logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

कोटक महिंद्रा बँकेच्या प्रतिनिधीकडून अपमानास्पद वर्तन व मानसिक त्रास

एकीकडे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना आधार देण्याची गरज असताना, कोटक महिंद्रा बँकेच्या कर्ज वसुली एजंटकडून मानसिक त्रास देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रशांत खंदारे नावाच्या व्यक्तीने बँकेच्या प्रतिनिधीने केलेल्या अवमानास्पद वर्तनामुळे आत्महत्येच्या विचारांपर्यंत पोहोचल्याचा गंभीर आरोप केला आहे.

प्रशांत खंदारे यांनी काही काळापूर्वी स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र व्यवसायात तोटा झाल्याने ते सध्या आर्थिक अडचणीत आहेत. या परिस्थितीत कोटक महिंद्रा बँकेच्या वतीने +91 8422-951628 या क्रमांकावरून त्यांना सतत फोन करून ताण देण्यात आला.

प्रतिनिधींनी “तुम्हाला खायला मिळतं का?”, “तुमच्या रेफरन्सला कॉल करून त्यांना त्रास देईन” अशा शब्दांत धमकी दिल्याचा दावा खंदारे यांनी केला आहे. या वर्तनामुळे त्यांना प्रचंड मानसिक ताण जाणवत असून, आत्महत्येसारख्या टोकाच्या विचारांनी ते ग्रस्त आहेत.

खंदारे यांनी RBI, कोटक महिंद्रा बँक, आणि IBA यांच्याकडे तक्रार पाठवली असून, संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

या प्रकरणामुळे कर्ज वसुली प्रक्रियेमध्ये एथिक्सचा अभाव आणि ग्राहकांच्या मानसिक आरोग्याकडे होत असलेले दुर्लक्ष पुन्हा एकदा समोर आले आहे.
या परिस्थितीत कोटक महिंद्रा बँकेच्या वतीने +91 8422-951628 क्रमांकावरून त्यांना सतत फोन करून ताण देण्यात आला.

186
328 views

Comment