
कराटे मास्टर नानासाहेब बच्छाव यांचे जय मल्हार एंटर टेनमेंट चा पहिला मराठी चित्रपट सावित्री कलयुगातील लवकर च संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे .
सावित्री कलयुगातील हा मराठी चित्रपट माय बाप प्रेक्षकांच्या भेटीस आम्ही 06 जून 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात घेऊन येत आहोत.या चित्रपटाची खासियत अशी आहे की हा स्त्री प्रधान चित्रपट आहे.त्या मुळे आम्ही वट सावित्री पौर्णिमे निमित्त महाराष्ट्रातील संपूर्ण रसिकांना एक ऑफर देत आहोत.06/06/2025 ते 08/06/2025 असे तीन दिवस एका तिकीटावर एक फ्री.म्हणजे पत्नी सोबत पती फ्री. बहिणी बरोबर बहीण फ्री, भावा बरोबर भाऊ , मित्रा बरोबर मित्र जाऊ शकतात
हा चित्रपट कराटे मास्टर नानासाहेब बच्छाव ,(खानदेश) यांनी जय मल्हार एंटर टेनमेंट व SP प्रॉडक्शन निर्मित केला असून कथा पटकथा व दिग्दर्शन प्यारेलाल शर्मा सर यांनी केले आहे. संवाद लेखन राकेश शिर्के ,सुजाता पवार यांचे आहे.चित्रपट शानदार तयार झाला आहे . माय बाप प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती.
कलाकार पवन चौरे , महेक शेख, नाना बच्छाव,किरण ब्राह्मणे, रविकुमार, अविनाश मोरे ,सर्व कलाकारांनी सुंदर काम केले आहे.कृपया एकदा थिएटरला जाऊन पाहावा कलियुगातील सावित्री च्या संघर्षाची कहाणी
आपलाच नाना बच्छाव
निर्माता व अभिनेता