logo

बुलडाणा येथे शॉर्ट सर्किट मुळे मिर्झा नगर परिसरातील ५ घरे जळून खाक .!!

मन्सूर शहा.:--शॉर्ट सर्किट मुळे मिर्झा नगर परिसरातील ५ घरे जळून खाक झाली. त्या नुकसान ग्रस्त घरांची,व नुकसानीची आज सकाळी पाहणी केली..या पाचही परिवारांची भेट घेतली. त्यांना आधार दिला, हिम्मत दिली.शासनाने पाचही कुटुंबाना भरीव मदत करावी..अशी मागणी सरकारकडे केली..या सर्व घरांमधील संपूर्ण सामान, भांडे कुंडे,दागिने, पैसेही जळून खाक झालेत. हे परिवार कपडे व चप्पल बूट चे छोटे व्यवसायिक असल्यामुळे घरात कपड्यांचा व चप्पल बूटचा लाखो रुपयांचा मोठा माल ठेवलेला होता, तोही जळून गेल्याने हे सर्व परिवार उघड्यावर आलेत...! सूदैवाने जिवीतहानी झाली नाही पण घरं मात्र उध्वस्त झालीत. या कुटुंबांची अवस्था बघवत नाही..!अंगावरचे कपडे सोडून या परिवारांकडे काहीही शिल्लक नाहीये.यावेळी महावितरण चे अधीक्षक अभियंता श्री कटके, बुलडाणा तहसीलदार यांचेशी फोन वरून सविस्तर चर्चा केली. तात्काळ पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव पाठवण्याच्या विनंती वजा सूचना केल्या. मुख्यमंत्र्यांनी व शासनाने विशेष बाब म्हणून या पाचही कुटुंबांना भरीव नुकसान भरपाई द्यावी,अशी आग्रही मागणी यावेळी केली.
यावेळी माझ्या सोबत गजानन नाईकवाडे,ॲड राज शेख, मा. नगरसेवक मो. अजहर, मो. दानिश, शेख साजिद, मो. इमरान खान, मो.शहा, मो. शानवाज, मो.शोहेब, रफिक शहा, शेख इनुस, बबलू खान, मो.अकील, शेख कोसीब, शेख राजा यांच्यासह अनेक सहकारी उपस्थित होते.

19
2283 views