logo

संच मान्यता रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात शिक्षकांचा आक्रोश

अकोला / अमरावती :- विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली, 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयाविरोधात, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयासमोर आज जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले.या निदर्शनांचे नेतृत्व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय सरकार्यवाह तथा शिक्षक आमदार,मा.सुधाकरराव अडबाले यांनी केले. त्यांच्यासोबत प्रांतीय उपाध्यक्ष मा. जयदीप सोनखासकर यांची प्रमुख उपस्थिती होती.शिक्षकांनी मागणी केली की, संच मान्यतेसंदर्भातील 15 मार्च 2024 चा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा आणि 28 ऑगस्ट 2015 च्या शासन निर्णयानुसारच 2024-25 साठी संच मान्यता द्यावी. यामुळे बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या अनेक शाळांना नवे जीवन मिळेल आणि शिक्षकांच्या नोकऱ्या सुरक्षित राहतील.या मागणीचे निवेदन शालेय शिक्षण मंत्री मा. दादाजी भुसे यांना देण्यात आले असून, उपशिक्षणाधिकारी मा. निखिल मानकर यांनी दुपारी 12 वाजता ते स्वीकृत केले.निवेदन सादर करताना उपस्थित मान्यवर व शिक्षक पदाधिकारी
प्रांतीय उपाध्यक्ष जयदीप सोनखासकर जिल्हा कार्यवाह (महानगर) अरविंद चौधरी
गजेंद्र शेंडे, नीलकंठ गणवीर, रवींद्र मांगलेकर,गजानन पोटदुखे, अमोल माकोडे, बाबाराव कडू,श्रीमती प्रणिता शेळके, श्रीमती रेश्मा कपूर, दिपक चवरे,राजेंद्रप्रसाद भस्मे, श्रीमती एन. जी. बजाज, आर. पी. कपिले,अविन बा. देशमुख, शैलेश दा. काळे, पुरुषोत्तम खैरकर,प्रवीण गायकवाड, सुनील मावस्कर, एम. एम. डोंगरे,बी. एस. सपटे, सौ. एस. जी. वैराळे, सौ. व्ही. बी. राऊत
श्रीमती व्ही. आर. रायबोले, यश म्हातारमारे, एम. एच. कुरवान,एम. व्ही. कुमार, पी. पी. दामले, कु. जयश्री आडे
ए. आर. इंगळे, ए. जी. बोरकर, व्ही. पी. नागदिवे,एम. पी. गोरडे, ए. आर. जाधव, ए. एन. खत्री, आदित्य कपिले,सौ. एस. जी. बिहाडे, सौ. पी. एम. बुरंगे, डी. बी. राठोड,नितीन गणेशपुरे, पी. एस. रामटेके, एस. यू. वाघमारे,ए. व्ही. अनासाने, अनिल मावस्कर, आर. एम. उमक,एस. एम. गायकवाड, एस. जी. सोनार, वसीम फरहत
आदी असंख्य शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षक आमदार अडबाले यांचे प्रतिपादन :"शासनाचा निर्णय अन्यायकारक असून, यामुळे हजारो शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. तो रद्द झाला नाही, तर शिक्षक संघ राज्यभर तीव्र आंदोलन उभारेल."अशा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिले.

33
3772 views