logo

ज्ञानगंगा अभयारण्यात 11 बिबट्यांचे साम्राज्य..!

ज्ञानगंगा अभयारण्यात बुध्द पौर्णिमेला वन्यजीव गणना..
11 बिबट्यासह 524 वन्यजीवांचे झाले दर्शन

बुलढाणा /सत्य कुटे :
ज्ञानगंगा अभयारण्यात 12 मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या प्रकाशात प्राणी गणना करण्यात आली. या गणनेत 11 बिबट्यांसह एकूण 524 प्राण्यांचे दर्शन झाले आहे. ज्ञानगंगा अभयारण्यात झालेल्या प्राणी गणनेत 11 बिबटे, 25 अस्वल, 6 तडस यांच्यासह इतर प्राण्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती बुलढाणा आरएफओ प्रकाश सावळे आणि खामगाव आरएफओ दीपेश लोखंडे यांनी आज 13 मे रोजी दुपारी 4 वाजता दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील बोथा जंगलात मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचा अधिवास असल्याकारणाने शासनाने या जंगलाला 1997 मध्ये ज्ञानगंगा अभयारण्य म्हणून घोषित केले.
दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख चंद्रप्रकाशात वन्यप्राण्यांची गणना केली जाते. विभागीय वनअधिकारी अनिल निमजे, एसीएफ चेतन राठोड यांच्या मार्गदर्शनात ज्ञानगंगा अभयारण्यातील बुलढाणा आणि खामगाव या दोन्ही रेंज मध्ये यावर्षी 12 मे रोजी जवळपास 30 मचाणावरून प्राणी गणना करण्यात आली.
गत काही दिवसांपासून अवकाळी पाऊस होत असल्याने पर्यटकांसाठी 30 मचाण ठेवण्यात आले होते.41 पर्यटकांबरोबर 20 वनरक्षक, 9 वनपाल, 2 आरएफओ आणि वनमजुर यांनी ज्ञानगंगा अभयारण्यात पणावठ्यावर प्राणी गणना केली. या अभयारण्यात अस्वलांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असल्याने हे अभयारण्य अस्वलांची भूमी म्हणून ओळखले जाते. या प्राणी गणनेत 11 बिबट, 25 अस्वल, 6 तडस, 8 सायळ, 9 हरीण, 2 चिंकारा, 16 भेडकी, 69 नीलगाय, 180 रानडुक्कर, 115 मोर लांडोर, 1 खवल्या मांजरसह एकूण 524 प्राण्यांची नोंद करण्यात आली.

30
3879 views