logo

जनता विद्यालय, पिंपळगाव सराईचा निकाल १००% : प्राची सिरसाट टॉपर


दि. १३ मे २०२५ –
जनता विद्यालय पिंपळगाव सराई (ता. बुलढाणा) येथे पार पडलेल्या इ. १० वीच्या शालांत परीक्षेचा निकाल दिमाखात जाहीर करण्यात आला. यंदा विद्यालयाने सलग यशाची परंपरा कायम ठेवत १००% निकालाची उज्ज्वल कामगिरी केली आहे. एकूण १२२ विद्यार्थ्यांपैकी सर्वच १२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात ६४ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी, ४३ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर १५ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवली आहे.

विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये प्राची सिरसाट हिने ९४.६०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रतीक डुकरे (९४.२०%) आणि साक्षी नाटेकर (९४.००%) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत.
टॉप ११ यादीत पुढील विद्यार्थ्यांचा समावेश आहे:
४) सृष्टी पाटोळे – ९२.४०%
५) लक्ष्मी सिरसाट – ९१.६०%
६) जान्हवी भिवटे – ९०.६०%
७) श्रद्धा ठाकूर – ९०.२०%
८) समीक्षा सातव – ९०.२०%
९) प्रियांका गवते – ८९.६०%
१०) समीक्षा झगडे – ८९.२०%
११) अर्पिता खंडागळे – ८९.००%

विषयानिहाय टॉपर विद्यार्थ्यांचेही विशेष कौतुक झाले.
मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गणित या विषयांमध्ये साक्षी नाटेकर हिने वर्चस्व राखले आहे. तिने मराठीत ८६, हिंदीत ९४, इंग्रजीत ९२ आणि गणितात शंभर पैकी शंभर गुण मिळवून अपूर्व यश संपादन केले. इंग्रजीत प्राची सिरसाट हिनेही ९२ गुण मिळवले.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयात प्रतीक डुकरे ह्याने ९९ गुण मिळवले असून सामाजिक शास्त्रात ९६ गुण मिळवून तो या विषयातही टॉपर ठरला.

विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांसमोर निकाल जाहीर करताना सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच शिक्षण प्रसारक मंडळ चिखली यांच्यावतीने विद्यार्थ्यांचे कौतुक करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या घवघवीत यशामागे विद्यार्थी, वर्गशिक्षक सुहास कुळकर्णी , प्रशांत देशमाने, सर्व शिक्षकवृंद आणि पालकांचे अथक परिश्रम असून हे यश सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे विद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.
सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षक वृंद यांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. रामकृष्णदादा शेटे, सचिव मा. प्रेमराजजी भाला सर्व संचालक तथा सर्व सल्लागार समिती सदस्य यांनी अभिनंदन केले..

104
5372 views