logo

‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये ‘उद्योजक परिसंवाद-२०२५’ चे आयोजन

नांदेड, दि. १३ ः स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे दि. १४ मे रोजी ‘विद्यापीठ उद्योजक परिसंवाद-२०२५’ चे आयोजन विद्यापीठातील अधिसभा सभागृहामध्ये सायंकाळी ०४:३० वा. करण्यात आले आहे.

या उद्योजक परिसंवादास प्रमुख अतिथी म्हणून जळगाव येथील सीएमडी बीटाचे असोसिएट तथा मद्रास येथील एईडीपी इम्प्लेमेशन कमिटीचे चेरमण डॉ. भारत आमळकर उपस्थित राहणार आहेत. तर विशेष उपस्थितीमध्ये नांदेड येथील इंडस्ट्री असोशियनचे सीए हर्षद शहा, गणेश महाजन हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, मा. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, नरेंद्र चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहेत. तसेच या परिसवांदमध्ये विद्यापीठ परिक्षेत्रातील चारही (नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली) जिल्यामधील नामांकित उद्योगपती उपस्थित राहणार आहेत. या बरोबरच विद्यापीठ संकुलामधील संचालक आणि कांही निवडक प्राचार्य यांचीही उपस्थिती राहणार आहे.

या परिसंवादाचा मुख्य उद्देश शैक्षणिक उद्योगामध्ये भागीदारी मजबूत करणे, उद्योगाच्या वाढत्या गरजांशी शिक्षणाचे संरेखन करणे, कौशल्य विकासाला चालना देणे आणि विद्यार्थ्यांसाठी अर्थपूर्ण संधी निर्माण करणे हा आहे. विद्यार्थ्यांच्या या अडचणी दूर करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ शैक्षणिक धोरण-२०२० च्या अनुषंगाने अप्रेंटिसशिप अम्बेडेड डिग्री प्रोग्राम सुरू करणार आहे. यामध्ये शैक्षणिक उद्योग सहकार्य अंतर्गत बाजाराच्या गरजानुसार अभ्यासक्रम संरेखित करण्यासाठी अप्रेंटिसशिप अम्बेडेड डिग्री प्रोग्राम डिझाईन करण्यासाठी उद्योग सूचना मिळवता येतील, इंटर्नशिपच्या संधीमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळवण्यासाठी संरचित इंटर्नशिप कार्यक्रमावर चर्चा, ऑन जॉब ट्रेनिंग करिता व्यवहारिक कौशल्य वाढविण्यासाठी ऑन जॉब ट्रेनिंग मॉड्युल्ससाठी भागीदारी, प्लेसमेंट आणि जॉब फेयरमध्ये कार्यक्रमादरम्यान जॉब फेअरद्वारे थेट भरतीच्या संधी उपलब्ध करणे, अपेक्षित निकालासाठी एईडीपी इंटर्नशिप आणि ऑन जॉब ट्रेनिंग साठी उद्योजकांसोबत सामंजस्य करार, अभ्यासक्रम आधुनिकीकरणासाठी कृतीशील अंतर्दृष्टी, २०२५ च्या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उद्योजकांकडून वचनबद्धता, संस्थात्मक विकासासाठी सीएसआर भागीदारी यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या परिसंवादामध्ये जास्तीत जास्त उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले आहे.

या विद्यापीठ ‘उद्योजक परिसंवाद-२०२५’ कार्यक्रमासाठी नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य विभागाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर, आयक्यूएसी विभागाचे संचालक डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी, प्रा. डॉ. बालाजी मुधोळकर परिश्रम घेत आहेत.

0
0 views