logo

लक्ष्मीनगर अष्टविनय महिला  मंडळाचा  बुद्ध जयंती महोत्सव संपन्न

वार्ताहर
नागपूर: काटोल

            अष्टविनय महिला मंडळ लक्ष्मीनगर,काटोल यांच्यातर्फे दिनांक १२ मे २०२५ रोज सोमवारला वैशाखी पौर्णिमेच्या निमित्ताने  बुद्ध जयंती महोत्सव संपन्न झाला. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिक रवी दलाल यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिकेचे संचालक विवेक गायकवाड, काटोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निशांत  मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल गजभिये व ज्ञानेश्वर तोडसाम हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते तर  अष्टविनय महिला मंडळाचे  अध्यक्ष अरुणाताई गजभिये व उपाध्यक्ष लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.
     सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. या समयी अष्टविनय महिला मंडळाच्या महिलांनी बुद्ध गीते सादर केली. यानंतर सामाजिक कार्यकर्ते प्रफुल गजभिये हे  महाविद्यालयातील कार्यालयीन पदावरून निवृत्त झाल्यामुळे त्यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर  बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना श्री. गजभिये म्हणाले की, माझे उर्वरित आयुष्य मी समाजकार्यासाठी अर्पण करत आहो. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी  विवेक गायकवाड आपल्या भाषणात म्हणाले की, भगवान गौतम बुद्ध हे स्त्रियांना पहिल्यांदा समानतेचा अधिकार देणारे महामानव होय. हेच अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये अबाधित केलेले आहे. सोबतच  विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी विशेष मार्गदर्शन केले. निशांत मेश्राम यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.  आपल्या अध्यक्षीय भाषनात रवी दलाल म्हणाले की, जिथे जिथे स्त्रियांची चळवळ असते किंवा ज्या चळवळीत स्त्रिया असतात त्या सर्व चळवळी  प्रमाणिकतेवर आधारित असतात म्हणून स्त्री ही नीतिमान समाजाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे असे मत व्यक्त केले.
      याप्रसंगी  अभिवादन रॅलीचे  आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर छोट्या मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम  घेण्यात आलले.
       कार्यक्रमाची प्रस्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. वंदना कठाणे यांनी केली तर उपस्थितांचे  आभार रंजनाताई जांभुळकर यांनी  मानले.या कार्यक्रमाला प्रा.कठाणे सर, श्री राजेंद्र पाटील व तेजकुमार जांभुळकर यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमात अष्टविनय महिला मंडळाच्या  सर्व सदस्या आणि लक्ष्मी नगरच्या बहुसंख्य महिला आणि पुरुष सहभागी झाले होते.

दिपक.एस.ढोके
ऑल इंडिया मीडिया असोसिएशन
(Aima)

   

34
4791 views