logo

नूतन ज्ञान मंदिर विद्यालय अडावद तालुका चोपडा जिल्हा जळगाव या विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम....

नूतन ज्ञान मंदिर विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम....

अडावद ता चोपडा येथील नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम राखत सेमी इंग्लिश विभागाचा निकाल 100% टक्के लागला असून विद्यालयाचा एकूण निकाल 99.44 टक्के इतका लागला आहे. विद्यालयातून एकूण 181 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 180 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 70 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे तर 76 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.30 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले असून 4 विद्यार्थी हे पास क्लास मध्ये आहेत. विद्यालयातून प्रथम कु शुभांगी दत्तात्रय पाटील 91.60, विद्यालयातून द्वितीय कु. स्वाती दिनकर चौधरी 90.80, विद्यालयातून तृतीय दोन विद्यार्थी आले असून धवल मनोहर सोनवणे 90.00 व कु कामाक्षी विशाल पाटील 90.00 गुण प्राप्त केले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉ. केदारजी थेपडे साहेब, संस्थेच्या सचिव आदरणीय सौ. सुषमाताई थेपडे,सर्व संचालक मंडळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर जे पवार सर, उपमुख्याध्यापक श्री एस के भंगाळे सर, पर्यवेक्षक श्री के आर कणखरे सर यांनी अभिनंदन केले.
विद्यालयाच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी देखील यशस्वी विद्यार्थ्यांचे शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

13
2221 views