logo

श्री शिवाजी विद्यालय रिसोडच्या विद्यार्थ्यांचे सुयश !

*श्री शिवाजी विद्यालय रिसोडच्या विद्यार्थ्यांचे सुयश !*

रिसोड महेंद्र कुमार महाजन

माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2025 चा निकाल दि.13 मे रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला असून, यामध्ये श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड च्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे.
विद्यालयाचा निकाल 97.63% लागला.
कु.दिव्या जनार्धन चौधरी ही 96.00 % गुण मिळवुन प्रथम आली, तर कु. मानसी संतोष घायाळ 95.00 % व यश नागेश पवार हे द्वितीय आलेत, कु. नम्रता रवींद्र घायाळ 93.40 % ही विद्यार्थीनी तृतीय आली आहे,तर उर्दू माध्यमातून यासिरोद्दीन मोईनोद्दीन हा विद्यार्थी 91.20 % गुण मिळवून प्रथम आला आहे.
या विद्यालयातील एकूण 253 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 15 विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले, 92 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, 93 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर 47 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यालयातील 15 विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त गुण मिळाले.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा शिक्षक आमदार ॲड.श्री किरणराव सरनाईक, श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिम चे सर्व पदाधिकारी तसेच श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड चे शाळा समिती संचालक श्री पंजाबराव देशमुख, श्री जितेंद्रकुमार दलाल,श्री संजयकुमार जीरवणकर, प्राचार्य श्री संजयराव देशमुख, उपमुख्याध्यापक श्री संजयराव नरवाडे, पर्यवेक्षक श्री.गजानन भिसडे यांनी अभिनंदन केले आहे.

2
0 views