logo

माजी आमदार स्व.आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांची जयंती साजरी....!

माजी आमदार स्व.आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांची जयंती साजरी करण्यात आली.
पाचोरा प्रतिनिधी जिल्हाध्यक्ष (Aima Media ):-
बांबरुड (राणिचे) येथील रहिवाशी व माजी आमदार आप्पासाहेब ओंकार वाघ व "खान्देशचा ढाण्या वाघ" म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असलेले पाचोरा तालुक्याचे सहकार आणि शैक्षणिक विकासाचे प्रणेते सहकारमहर्षी माजी आमदार स्व. आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांची मंगलवार दि.१३ मे रोजी ९३ वी जयंती साजरी करण्यात आली.

बांबरुड राणिचे येथील डॉ राम मनोहर लोहिया विद्यालयातील स्व.आप्पा साहेब ओंकार नारायण वाघ यांच्या शक्तीस्थळाला माजी आमदार भाऊसो दिलीप वाघ ,पीटीसी चेअरमन नानासो संजय वाघ,कृउबा माजी सभापती दगाजी वाघ खलील देशमुख यानी पुष्पार्पण व अभिवादन केले.

सहकार आणि शैक्षणिक विकासाचे प्रणेते सहकारमहर्षी स्व. आप्पासाहेब समाजकारण ,सहकार, शिक्षण केंद्रबिंदू मानून पाचोरा भडगाव मतदारसंघात विकासाचे नवे पर्व सुरू केले. मतदारसंघात विविध प्रकल्प आणून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणली. तसेच पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेकविध आज लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन यशस्वी कारकीर्द घडवित आहेत. यावेळी तालुक्यातील आप्पा साहेबांवर प्रेम करणारे व पाचोरा सहकारी शिक्षण संस्थाचे कर्मचारी व शिक्षक वर्ग आणि गावातील नागरिक व पत्रकार बंधु उपस्थित होते.

18
2009 views