Aadhaar card साठी कुठेही जाण्याची गरज नाही, अधिकारी स्वत: घरी येतील, जाणून घ्या Aadhaar card प्रत्येक ठिकाणी आता आवश्यक
Aadhaar card साठी कुठेही जाण्याची गरज नाही, अधिकारी स्वत: घरी येतील, जाणून घ्याAadhaar card प्रत्येक ठिकाणी आता आवश्यक झाले आहे. शाळा प्रवेश आणि सरकारी योजनांसाठी आता मुलांसाठीही Aadhaar card अनिवार्य करण्यात आले आहे. पाच वर्षांखालील मुलांसाठी ऑनलाइन निळे Aadhaar card मिळवणे अतिशय सोपे आहे. आता या निळ्या Aadhaar card ची नेमकी प्रोसेस आहे तरी काय, चला तर मग याविषयी पुढे विस्ताराने माहिती जाणून घेऊया.कुठेही गेलात तरी Aadhaar card हे आधी विचारतात. ओळखपत्र आणि पॅन या दोन्हीपेक्षा देखील Aadhaar card गरजेचे झाले आहे. अलिकडे परीक्षांमध्येही बायोमॅट्रिकसाठी Aadhaar card सक्ती करण्यात येत आहे. यावरुन तुमच्या लक्षात आलं असेल की Aadhaar card किती गरजेचं आहे. आता लहान मुलांचे Aadhaar card तुम्हाला घरी बसल्या मिळू शकते. आता यासाठी नेमके काय करावे लागेल, चला जाणून घेऊया.Aadhaar card हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. याची गरज केवळ प्रौढांनाच नाही तर लहान मुलांनाही असते. शाळा प्रवेश असो किंवा सरकारी योजनांशी निगडित कोणतेही काम असो, त्याची सर्वत्र गरज असते. तुमच्या घरात 5 वर्षांपेक्षा लहान मूल असेल तर तुम्ही अगदी सहजपणे ऑनलाईन Aadhaar card मिळवू शकता.यात विशेष म्हणजे मुलांचे Aadhaar card बनवताना डोळ्यांचे रेटिना स्कॅन करण्याची गरज भासत नाही किंवा फिंगरप्रिंट स्कॅन करावा लागत नाही. यामुळे आधार केंद्रात न जाता मुलांचे Aadhaar card सहज मिळू शकते. चला जाणून घेऊया त्याविषयी सविस्तर.निळे Aadhaar card कसे बनवावे?मुलांच्या Aadhaar card ला ब्लू आधार कार्ड असेही म्हणतात. या Aadhaar card ची खासियत म्हणजे ते मुलाच्या पालकांच्या Aadhaar card शी जोडलेले आहे. अशावेळी तुम्हाला आधार केंद्रावर जाण्याची गरज नाही आणि तुम्ही घरबसल्या निळ्या Aadhaar card साठी ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी, तुम्हाला पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.