logo

शिरसोली येथे १० दिवसाआड पाणी पुरवठा...

शिरसोली, ता. जळगाव: शिरसोली प्र.न.

व शिरसोली प्र. बो. या दोन्ही गावांना दापोरा येथील गिरणा नदीवर असलेल्या विहिरीवरून पाणीपुरवठा केला जात असतो. मात्र, शिरसोली प्र. न. येथे आठ दिवसाआड होणारा पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून १५ ते २० दिवसाआड होत असल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी एक ते दीड किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.

शिरसोली प्र.बो. मधून आणावे लागते पाणी

शिरसोली प्र. न. या गावाला उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या अधिक झळा बसत असतात. शिरसोली प्र.बो. येथे ६० वर्षांपूर्वीची पाण्याची टाकी असून या टाकीत पाणी साठविले जाते. या ठिकाणावरून शिरसोली प्र.न. येथील महिला, ग्रामस्थ व बच्चे कंपनी हातगाडीच्या साहाय्याने किंवा मिळेल त्या साहित्याने पाण्याची वाहतूक करीत असतात.

18
1452 views