logo

Mhada Lottery 2025 : आता मुंबई आणि आजूबाजूच्या भागात घर घेणं म्हणजे खरंच सोपं राहिलेलं नाही. अगदी वन बीएचके घर (1BHK Fla

Mhada Lottery 2025 : आता मुंबई आणि आजूबाजूच्या भागात घर घेणं म्हणजे खरंच सोपं राहिलेलं नाही. अगदी वन बीएचके घर (1BHK Flat) घ्यायचं म्हटलं तरी कोट्यवधी रुपये लागतात. सर्वसामान्य माणसासाठी तर ह अशक्यच म्हणावं लागेल. त्यामुळे सामान्य लोकांनाही मुंबईत घर घेता यावे यासाठी म्हाडा दरवर्षी हाऊसिंग योजना (Mhada housing scheme) जाहीर करते. ज्यामुळे गोरगरीब व सामान्यांना कमी किंमतीत घर मिळण्याची संधी मिळते. मागच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये मुंबई मंडळासाठी लॉटरी जाहीर झाली होती, आणि आता कोकण मंडळाची लॉटरी देखील येत आहे. येणाऱ्या जुलै महिन्यात कल्याण आणि ठाणे भागात घरांसाठी ही लॉटरी काढली जाणार आहे. त्यामुळे या प्रगतशील भागात ज्यांना स्वतःचं घर हवंय, त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. जुलै महिन्यातील या योजनेमुळे स्वप्नातलं घर मिळवण्याचा मार्ग आता नक्कीच सोपा होणार आहे.

जुलैमध्ये म्हाडा कोकण मंडळ एक मोठी लॉटरी घेऊन येतंय, ज्यात जवळपास चार हजार घरं असणार आहेत. मागच्या दीड वर्षात म्हाडानं तीन वेळा लॉटरी काढली आणि त्यातून सुमारे दहा हजार लोकांना मुंबईसारख्या शहरात घर मिळालं. आता पुन्हा एकदा तसंच काहीसं होणार आहे. जुलै महिन्यात म्हाडा लॉटरीच्या माध्यमातून तब्बल चार हजार घरांसाठी संधी मिळणार आहे. या लॉटरीमध्ये चितळसरमधली म्हाडाने बांधलेली 1173 घरे असतील, आणि त्याचबरोबर हाउसिंग स्टॉकमधून मिळालेली काही घरेही यामध्ये जोडली जाणार आहेत. कल्याणमध्ये तर म्हाडाला तब्बल अडीच हजार घरे मिळाली आहेत. त्यामुळे यंदा ठाणे आणि कल्याण हे दोन भाग लॉटरीसाठी हॉटस्पॉट ठरणार आहेत.


येथे वाचा – मुंबईत अवघ्या 12 लाखांत मिळणार घर; पण ‘ही’ अट कायम, पहा संपूर्ण माहिती..!

घर हवंय? पुन्हा म्हाडाची दिवाळी आधीच नवीन लॉटरी


यंदा म्हणजेच 2025 मध्ये म्हाडा मुंबईकरांसाठी एक उत्तम संधी घेऊन येत आहे. जवळपास 5,000 घरांची लॉटरी काढली जाणार आहे. आणि हो, ही लॉटरी दिवाळीच्या आधीच जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुंबईकरांनी आतापासून तयारीला लागायला हवं. यंदाच्या अर्थसंकल्पात म्हाडानं मोठं उद्दिष्ट ठेवलं आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यभरात 19,496 घरं बांधण्याचं, तसेच यामधून एकट्या मुंबईमध्येच तब्बल 5199 एवढी घरं उभारली जाणार आहेत. फक्त मुंबईच नाही, तर पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर आणि कोकण या भागांमध्येही घरं बांधण्याचं म्हाडाचं प्लॅनिंग सुरू आहे.

येथे वाचा – मुंबईत घर घेणाऱ्यांची ‘या’ भागाला सर्वाधिक पसंती! तुमचं पुढचं घर याच भागात असावं का? लगेच वाचा!

0
0 views