रवंजे येथे वाळू उपशाची दोन यंत्र जप्त....
एरंडोल : रवंजे (ता. एरंडोल) परिसरात गिरणा नदीपात्रातून वाळू उपसा होत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने महसूल यंत्रणेच्या पथकाने छापा टाकला. यात दोन यंत्र, तीन फावडे व दोरखंड असे साहित्य मिळून आले मात्र चोरटे पसार झाले होते.रवंजेसह परिसरात गिरणा नदीपात्रातूनबेसुमार वाळूचा उपसा केला जात आहे. बिनधास्त वाळूची वाहतूक होत आहे. याबाबत महसूल पथकाला वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच पथकाने घटनास्थळी छापा टाकला. या ठिकाणी वाळू उपसा करणारे दोन यंत्र, तीन फावडे व दोरखंड असे साहित्य मिळून आले. मात्र, वाळ चोरट्यांना याबाबत कुणकुण लागल्याने चोर पसार झाले.