logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*कै. तातू सिताराम राणे ट्रस्ट संचलित गोवर्धन गोशाळा उदघाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपास्थितीत झाला सोहळा : राणे कुटुंबियांच्या तीन पिढ्या उदघाटन स्थळी उपस्थित*

कणकवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ,माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे खासदार नारायण राणे यांच्या करंजे येथील गोवर्धन गोशाळेच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर आगमन झाले. नीलम राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे,आमदार रवींद्र फाटक,माजी आमदार प्रमोद जठार ,माजी आमदार राजन साळवी,माजी आमदार प्रवीण भोसले जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, यांच्यासह जिल्हाधिकारी अनिल पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब,विधानसभाप्रमुख मनोज रावराणे, महिला जिल्हाप्रमुख श्वेता कोरगावकर, संदेश सावंत, अशोक सावंत,संदीप साटम, कणकवली तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, देवगड तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, राजू शेट्ये,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, संतोष कानडे, संजय पडते आदींसह प्रियांका राणे, ऋतुजा राणे, चिरंजीव अभिषेक, चिरंजीव निमिष आदी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते या गोशाळेचे उदघाट्न करण्यात आले.


♦️ गाय म्हणजे प्रगती :गोवर्धन गोशाळेने प्रेरित होऊन उद्योजक निर्माण व्हावेत - खासदार नारायण राणे

कणकवली : गाय म्हणजे प्रगती.गायीला आपण माता मानतो. मागील 3 वर्षे करंजे येथील माळरानावर आम्ही गोवर्धन गोशाळेची मुहूर्त मेढ रोवली.आज गोशाळेत देशातील दीडशे विविध जातीच्या गायी आहेत. कोणती गाय किती लिटर दुध देते.कोणत्या गायीचे तूप चढ्या दराने विकले जाते याचे मार्गदर्शन येथे मिळणार. शेण शेतकऱ्यांकडून ५nरुपये किलो आणि गोमूत्र ९ रुपये लिटर दराने विकत घेणार आहोत.शेणापासून रंग, शेणखत, तसेच विविध उत्पादन घेणार आहोत. जिल्ह्याचे दरडोई असलेले अडीच लाखांचे उत्पन्न वाढावे यासाठी राणे कुटुंबाचा प्रयत्न आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा , जिल्ह्यात आय ए एस, आय पी एस सह प्रशासकीय अधिकारी निर्माण व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.या गोवर्धन गोशाळेच्या माध्यमातून जिल्ह्यातील व्यावसायिकांनी प्रेरणा घेऊन दुग्ध व्यवसायात उतरावे असे आवाहन खासदार नारायण राणे यांनी गोवर्धन गोशाळा उदघाटन प्रसंगी केले.


♦️ *गोवर्धन गोशाळा म्हणजे जैविक शेती, धार्मिक आस्था, पर्यावरण पूरक प्रकल्प - उपमुख्यमंत्री शिंदे*

♦️ *बाळासाहेबांच्या ढाण्या वाघाला बघून जंगलातील वाघ पळून गेला*

कणकवली : गोवर्धन गोशाळा हा शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक प्रकल्प आहे. हातात घेतलेले काम पूर्ण करणे ही नारायण राणेंची खासियत आहे. त्यामुळेच हा गोवर्धन प्रकल्प आहे. यामुळे कोकणात धवल क्रांती होईल.समृद्धीचे नवीन दालन सुरू झाले आहे. धाडसाने निर्णय घेऊन ते पूर्ण करणे हे राणेंनी दाखवले. गोवर्धन गोशाळेसाठी जमीन घेण्यासाठी करंजेत आल्यावर झाडावर वाघ बसलेला होता , आम्हाला बघून तो झाडावरून उतरून जंगलात गेल्याचा उल्लेख खासदार राणेंनी केला होता. त्याचा उल्लेख करत बाळासाहेबांच्या ढाण्या वाघाला बघून जंगलातील वाघ पळून गेल्यास आश्चर्य नाही असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.कोकणात आल्यावर देवभूमीत आल्यासारखे वाटते. कोकण हा निसर्गसंपन्न प्रदेश आहे.या देवभूमीत पर्यावरण स्नेही असा गोवर्धन गोशाळेचा प्रकल्प राणेंनी उभारला आहे. यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला नक्कीच हातभार लागेल. गाय ही केवळ पवित्र नसून ती उपयुक्त सुद्धा आहे. या प्रकल्पातून शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी येईल. गोशाळेच्या प्रकल्पातून जैविक शेती, धार्मिक आस्था आणि पर्यावरण पूरक संकल्पना राणेंनी प्रत्यक्षात आणली. गोवर्धन गोशाळेमुळे कोकणात धवलक्रांती येईल असेही शिंदे म्हणाले.


♦️ गोवर्धन गोशाळेच्या द्वारे राणेंनी कोकणविकासला, नैसर्गिक शेतीला चालना मिळेल - मुख्यमंत्री फडणवीस

कणकवली : हाती घेतलेले कार्य परफेक्ट होण्याकडे खासदार राणेंचा कटाक्ष असतो.गुणवत्तेचे राणे पारखी आहेत.याच गुणवत्तेच्या जोरावर राणेंनी गोवर्धन गोशाळा उभारली आहे. या भागातील शेतकऱ्यांना व्यवसायाभिमुख ट्रेनिंग दिले जाणार आहे. कृषी आणि पशु संवर्धनाचे हे केंद्र तयार झाले आहे. सनातन संस्कृती ही केवळ मूर्तिपूजक नसून ती कृषी निसर्ग पूजक आहे. सनातन संस्कृतीमध्ये गोमतेला उच्च दर्जा आहे.गोमाता आपण आईसमान मानतो.कृषी संस्कृतीत गोमातेला अन्यासाधरण महत्व आहे. गाय ही आजन्म देणारी आहे म्हणून ती कामधेनू आहे. राज्यात जिथे गोधन कमी झाले तिथे आत्महत्येचे प्रमाण वाढले. गोधनामुळे नैसर्गिक खत मिळायचे. कॅश क्रॉप मुळे नैसर्गिक शेती पद्धतीपासून दूर गेला. केमिकल शेतीचे दुष्परिणाम भोगल्यानंतर शेतकरी आता नैसर्गिक शेतीकडे पून्हा वळू लागला आहे. नैसर्गिक शेती गोमतेच्या संवर्धनाशिवाय अशक्य आहे. देशी गायींना चाऱ्याचे अनुदान आमच्या सरकारने सुरू केले आहे. ब्राझील देशाने आपल्या गीर, सेहवाल गायी नेऊन स्वतःची श्वेतक्रांती केली. राणेंच्या गोवर्धन गोशाळेत गीर , साहिवाल कपिला गाईंसह अन्य देशी गाय बघून आनंद झाला. शेणापासून रंग तयार होण्यासाठी राज्य सरकार ठोस पावले उचलणार आहे. कसायांकडे जाणाऱ्या भाकड गायीसुद्धा या गोशाळेत घेऊन त्याचे जतन केले जाणार आहे याचाही आनंद आहे.
राजकोट किल्ल्यावर जाऊन देशातील सर्वात उंच पुतळ्याचे आज आम्ही पूजन केले. शिवपुतळ्याकडे शिव आरती करून पुतळ्याचे लोकार्पण केले.आणि आता गोवर्धन गोशाळेचे उदघाटन केले हा दुहेरी योग असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

144
4521 views

Comment