
शहीद सचिन वनंजे याना शासनाकडुन एक कोटी ची मदत उपमुख्यमंञी अजित पवार यांची घोषणा
नांदेड, दि. ११ ः कै.सचिन वनजे हे जम्मु कश्मिर येथे कार्यरत असताना त्याना विरमरण आले असुन त्याना श्रध्दांजली वाहुन शासना कडुन त्याच्या कुटुबियाना 1 कोटी रु.चे अर्थसहाय्य देण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंञी ना. अजित पवार यांनी केली तसेच रमाई घरकुल देणे संबंधी अधिका-याना सुचना देण्यात आल्या आहेत.विरमरण आलेल्या सचिन वानंजे च्या कुटुंबीयाना सर्वतोपरी मदत करण्याचे अश्वासन राज्याचे उपमुख्यमंञी ना. अजित पवार यांनी दिले. ते बा-हाळी येथे राष्टवादी पक्षाच्या वतीने आयोजीत पक्ष प्रवेश मेळाव्यात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जेष्ठ नेते मा.खा. भास्करराव पाटील खतगावकर हे होते.आपल्या भाषणात बोलताना ते म्हणाले कि लाडक्या बहिणीसाठी वर्षाला 45000 कोटी रु. शासन खर्च करित आहे.ही योजना बंद होणार नाही आम्ही काही बॅकाशी चर्चा केली असुन लाडक्या बहिणीला व्यवसायासाठी 40-50 हाजार कर्ज द्या व बहिणीचा मिळणारे 1500 दरमहा जमा करुन घेतल्यास आमच्या बहिणी काही तरी व्यवसाय करु शकतील ह्या साठी प्रयत्न केले जात असल्याची माहीती त्यानी दिली.39 वर्षाच्या प्रदिर्घ प्रतीक्षैनंतर लेडीधरणाच्या गळभरणीस प्रारंभ झाला असुन,प्रकल्पग्रस्थाचे जे मुलभुत प्रश्न आहैत तो तुमचा हक्क आहे.त्यामुळे सर्वाशी चर्चा करुन त्याना न्याय मिळवुन दिला जाईल असे असै अश्वासन हु दिले. राजकारणात सुसंस्कृत नेतृत्वाला सधी दिली पाहीजे राष्टवादी पक्षात कार्यकर्त्याना सन्मानाची वागणुक मिळेल नवे व जुन्या कार्यकर्त्याना सोबत घेवुन आपला पक्ष वाढवत असताना सर्वाचा योग्य सन्मान राखला जाईल ह्याची खाञी देताना अगामी काळात होणा-या स्थानीक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यानी सज्ज राहण्याचे आवाहन ही केले. प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपल्या भाषनात मुखेड व कंधार तालुका डोगराळ भाग असल्याने ह्या भागात बेरोजगाराना रोजगार मिळवुन देणे साठी एखादा मोठा उद्योग मिळवुन द्यावा अशी मागणी केली तर मा.आ.अविनाश घाटे यानी बोधन लातुर रोड ह्या रेल्वे मार्गाची फार जुनी मागणी असुन ती पुर्ण झाल्यास ह्या भागाच्या विकासाला चालना मिळेल अशु अपेक्षा व्यक्त कैली. यावेळी बोलताना म.प्र. चे उपाध्यक्ष व्यकटराव पाटील गोजेगावकर यांनी आ.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेर्तृत्वाखाली रिष्टवादी पक्ष विस्तारीत होत आहे. असख्य कार्यकतेॅ पक्षात येत आहेत भविष्यात राष्टवादी अजित पवार गट जिल्यात एक नंबर चा पक्ष राहील याची खाञी दिली. उद्योग पर्यटन राज्यमंञी इंद्रनिल नाईक यांनी माझा या तालुक्याशी जवळचा संबंधअसुन भविष्यात या भागाच्या विकासासाठी मी सहकार्य करेन असेअश्वासन दिले. आपल्या प्रास्तावीक भाषणात शेषेराव चव्हाण यांनीसर्वसामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठीअजितत दादा पवाराच्या खबीर नेतृत्वाची गरज असुन, अजित दादा जे बोलतात ते करतात त्याच्यापक्षात सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही सन्मानाची वागणुक मिळत असल्याने राष्टवादीपक्षात येण्यासाठी अनेक उत्सुक असुन भविष्यात हा पक्ष जिल्ह्यात प्रथम राहील हे सांगुण 1998 पासुन बा-हाळी भागातील मुला मुलीच्या शिक्षणाची गैरसोय होऊ नये म्हणुन 1998 ला कै.भिमराव चव्हाण महाविद्यालयाचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबीत आहे. अद्याप न्याय मिळाला नाही ,हे महाविद्यालयाला मान्यता देवुन या भागातील विद्यार्थाची गैरसोय दुर करण्याची मागणी केली आहे.अध्यक्षीय भाषणात माजी खा. भास्करराव पाटिल खतगावकर यांनी आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्टवादी पक्ष यशस्वी वाटचाल करीत आहे,भविष्यात जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष राहील असा विश्वास व्यक्त केला. यापक्ष प्रवेश मेळाव्यात काग्रेस चे नेते शेषेराव चव्हाण, कृउबा चे माजी सभापती सुशांत चव्हाण,काॅग्रेस चे दिलीप कोडगीरे, जाहीरे, कै.किशनराव राठोड यांचे नातु मा.जि.प. सदस्य संतोष राठोड,गणपत गायकवाड प्राचार्य मनोहर तोटरे, मा.जि.प. सदस्य भंगारे आदी सह असंख्य कार्यकर्तानी राष्टवादी पक्षात प्रवेश केला.कार्यक्रमाचे प्रास्तावीक शेषेराव चव्हाण यानी केले तर अभार प्रदर्शन निखील चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी माजीसमाज कल्याण सभापती स्वप्निल चव्हाण, सुशांत चव्हाण, जि.प.च्या माजी अध्यक्षा सौ. वैशालीताई चव्हाण, तेजस चव्हाण,अमौल चव्हाण सह त्या भागातील कार्यकत्यानी परिश्रम घेतले होते.