
महाराणा प्रताप जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम
पिंपळगाव सराई (ता. बुलढाणा) | दि. ९ मे २०२५
जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव सराई येथे आज महाराणा प्रताप जयंतीनिमित्त एक प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांना सुट्टी असल्यामुळे हा कार्यक्रम शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत साधेपणाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रमोद ठोंबरे होते. प्रमुख वक्ते म्हणून सुदाम चंद्रे यांनी उपस्थित शिक्षकांशी संवाद साधला. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "महाराणा प्रताप यांनी दाखवलेली तत्त्वे आणि संघर्ष आपल्या आयुष्यात आचरणात आणणे हीच खरी त्यांना मानवंदना ठरेल."
प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, "आजच्या काळातील युवक व शिक्षकांसाठी महाराणा प्रताप यांचे जीवन हे खरे प्रेरणास्थान आहे. त्यांच्या जीवनातून शौर्य, स्वाभिमान आणि आत्मबल यांचा आदर्श घ्यावा."
या कार्यक्रमास विद्यालयाचे पर्यवेक्षक संजय पिवटे, मुख्य लिपिक विजय गाडेकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन मुख्य लिपिक विजय गाडेकर यांनी केले.