logo

चीनचे परराष्ट्र मंत्री आणि अजित डोवाल यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर पाकिस्तानकडून आधी शांततेच्या चर्चा आणि मग आग

चीनचे परराष्ट्र मंत्री आणि अजित डोवाल यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर
पाकिस्तानकडून आधी शांततेच्या चर्चा आणि मग आगळीक, आता पुढे काय काय घडणार?
Written बाय aima media जन जन की आवाज
Updated:
May 11, 2025 09:33 IST
India vs Pakistan Operation Sindoor Live Updates in Marathi
भारत पाकिस्तान लाईव्ह अपडेट्स| ऑपरेशन सिंदूर लाईव्ह अपडेट्स
Go to Live Updates
India Pakistan Tensions Live Updates ६ आणि ७ मेच्या रात्री भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाईला उत्तर दिलं. यानंतर पाकिस्तानचे नापाक इरादे जगाने पाहिले. ड्रोन हल्ले करणं, तोफांचा मारा, गोळीबार हे करणं पाकिस्तानने थांबवलं नाही. त्यामुळे भारताने त्यांना जशास तसं उत्तर दिलं. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी म्हणजेच १० मे च्या दिवशी संध्याकाळी ५ च्या दरमम्यान शस्त्रविराम करण्यास दोन्ही देशांनी तयारी दाखवल्याची पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनीही ही माहिती दिली. त्याचप्रमाणे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही लष्करी कारवाई थांबवण्याबाबत पाकिस्तानने सामंजस्य करार केल्याचं स्पष्ट केलं. मात्र भारत दहशतवादाविरोधात कुठलीही कारवाई सहन करणार नाही हेदेखील पाकिस्तानला ठणकावलं. दोन्ही देशातला संघर्ष थांबल्याची माहिती समोर आल्यानंतर अवघ्या तासांतच पाकिस्तानची आगळीक पुन्हा समोर आली. भारताच्या सीमेवर काही ड्रोन दिसल्याची माहिती समोर आली होती. शस्त्रविरामानंतर पाकिस्तानची आगळीक समोर आल्यानंतर भारताने पाकिस्तानला आता सूचक इशारा दिला आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पाकिस्तानच्या कुरापतींबाबत रात्री ११ वाजता पत्रकार परिषद घेत इशारा दिला आहे. पाकिस्तानने परिस्थितीचं गांभीर्य समजून घ्यावं, असं म्हणत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पाकिस्तानला खडसावलं आहे.पाहुयात याच संदर्भातले अपडेट्स लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.

1
0 views