
जिल्हा प्रशासनातील विविध विभागांत उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा दिशा जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन गौरव...
जिल्हा प्रशासनातील विविध विभागांत उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा दिशा जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला
पाचोरा प्रतिनिधी जिल्हाध्यक्ष (Aima Media):-
जिल्हा जळगांव केंद्र पुरुस्कृत योजना मध्ये जिल्हा प्रशासनातील विविध विभागांत उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आज "जिल्हा विकास समन्वयक समिती" मार्फत "दिशा जिल्हास्तरीय पुरस्कार" देऊन गौरव करण्यात आला. सदर पुरस्कार माझ्या व पालकमंत्री श्री.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी भाषणात "अधिकाऱ्यांनी केवळ कागदोपत्री काम न करता, प्रत्यक्षात नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. गरजू लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडवल्यास त्यांनाही समाधान मिळेल आणि आपल्यालाही काम केल्याचे समाधान लाभेल." जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. मात्र, अधिकाऱ्यांनी अधिक सक्रिय होऊन लोकांच्या समस्या सोडवण्यावर भर द्यावा, असे सांगितले.
यावेळी खासदार रक्षा ताई खडसे व पालकमंत्री श्री.गुलाबराव पाटील यांच्यासह खासदार स्मिताताई वाघ, आमदार श्री.सुरेश भोळे, आमदार श्री.चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, महानगरपालिका आयुक्त श्री.ज्ञानेश्वर ढेरे रेल्वे विभाग प्रबंधक इति पांडे ई. प्रमुख उपस्थितीत होते.