तहानलेल्या व्याकुळ झालेल्या उमरखेड तालुक्यातील अनेक गावातील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण
पब्लिक पोस्ट । प्रतिनिधी
उमरखेड : हर घर नल का जल
हा सरकार चा उद्देश जरी असला तरी तालुक्यातील अनेक गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे उमरखेड तालुक्यातुन पेनगंगा नदी जाते या नदीपात्रात अनेक बंधारे आहेत पूर्ण पणे आटले आहेत सहश्रकुंड धबधबा हा पूर्ण पणे कोरडा पडला आहे तालुक्यातील अनेक गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहेत एक दोन किलोमीटर
अंतरावर जाऊन ग्लास ने पाणी भरून डोक्यावर आणत आहेत हा प्रवास अंत्यत कष्टदायक आहेत आपल्या शेतातील काम आटोपून पाण्यासाठी वणवण फिरताना दिसत आहेत हंडाभर
पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहेत गुरे वासरे जंगलातील प्राणी पाण्यासाठी भटकंती करत आहेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी पाणी टंचाई संदर्भात वारंवार मागणी करण्यात आली मात्र तात्पुरता उपाययोजना करून प्रशासन पाणी टंचाई संदर्भात दर्लक्षित होताना दिसत आहेत पाणी टंचाई संदर्भात उपाययोजना करून तालुक्यातील पाणी प्रश्न सोडवावे हीच उपाययोजना नाही केल्यास बंजारा शक्ती सेना तालुका अध्यक्ष जनतेला सोबत घेउन जणआंदोलन करावे लागेल