logo

जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात अवकाळी पाऊस व वादळ मुळे नुकसान बाबत आढावा बैठक संपन्न...

अवकाळी पाऊस व वादळ मुळे नुकसान बाबत जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे आढावा बैठक घेतली ...
पाचोरा प्रतिनिधी जिल्हाध्यक्ष (Aima Media):-
जळगांव जिल्ह्यात दि.०६/०५/२०२५ रोजी सायंकाळी अवकाळी पाऊस व वादळी वारे येऊन अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असून, याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे माझ्या व पालकमंत्री श्री.गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आढवा बैठक घेण्यात आली.

यावेळी संबंधितांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे तत्काळ पंचमाने करणे बाबत सूचना देऊन, प्रधानमंत्री पिक विमा योजना (#PMFBY) अंतर्गत विमा उतरविलेल्या सर्व शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत क्रॉप इन्शुरन्स ॲप (Crop Insurance) वर किंवा पिक विमा कंपनी कडे संपर्क साधून आपल्या नुकसानीची माहिती देऊन पंचनामा करून घ्यावा अशा सूचना दिल्या.

यावेळीखासदार रक्षा ताई खडसे व पालकमंत्री श्री.गुलाबराव पाटील यांच्यासह खासदार स्मिताताई वाघ, आमदार श्री.सुरेश भोळे, आमदार श्री.चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल ई. उपस्थित प्रमुख उपस्थितीत होते.

0
0 views