logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

एक थेंब जवानांसाठी रक्तदात्यांनो, पुढाकार घेत रक्तदान करा. ॲड.शेख शाहजेब

बीड :
दिनांक: 10.05.2025
भारत-पाकिस्तान युद्ध सुरू आहे. यात काही जवान शहीद, तर काही जखमी होत आहेत. त्यांना वाचविण्यासाठी आपण पुढाकार घेत रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हा रुग्णालय प्रशासनाने केले आहे. यासाठी या' ठिकाणी करा रक्तदान बीड शहरातील सोमेश्वर मंदिरात सोमवारी रक्तदान करता येईल. तसेच गुरुवारी स्वामी समर्थ मंदिर, शनिवारी शनि मंदिर आणि पेंडगाव हनुमान मंदिरात शिबिराचे आयोजन केले आहे. याशिवाय आपण जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत येऊनही रक्तदान करू शकता, असे ॲड.शेख शाहजेब यांनी केले आहे .
जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत सध्या रक्ताचा ठणठणाट आहे. अशातच भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झाले आहे. त्यानुषंगाने आरोग्य विभागालाही सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात रक्तसाठा मुबलक ठेवण्यास सांगितले आहे. याच अनुषंगाने जिल्हा रुग्णालय प्रशासनाने आवाहन केले आहे.
आपण सीमेवर लढण्यासाठी जाऊ शकत नाही, पण त्यांच्यासाठी रक्ताचा एक थेंब देऊ: शकतो, अशी भावनिक साद घालत देशाच्या जवानांसाठी एक थेंब रक्ताचा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जास्तीतजास्त दात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे ॲड.शेख शाहजेब बीड़ यांनी केले आहे

122
9125 views

Comment