
*जी. एम. पेटे विद्यालय ब्राह्मणवाडा थडी येथे 1999, 2001 विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा संपन्न.......
* शिक्षकांची पूजा व सन्मान करून ऋणानुबंध पुरस्कारांनी सन्मानित करून शिक्षकांचा आदर वेगळ्या पद्धतीने व्यक्त केला...!
चांदूर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी पंचकोशीत नावाजलेल्या जी. एम. पेटे विद्यालय येथील 1999, 2001 मधील शिकत असलेल्या बॅच मधील विद्यार्थ्यांनी स्नेह मिलनाचा व भोजनाचा आस्वाद घेतला विद्यार्थ्यांनी तब्बल 25 वर्षानंतर स्नेह मिलान सोहळा आयोजित करून शिक्षकांचा सन्मान केला तर विविध क्षेत्रात कार्यरत असलेले उत्कृष्ट कामगिरीबद्दल ऋणानुबंध पुरस्कार व विद्यार्थी सन्मान पुरस्कार सर्वांना गौरविण्यात आले, विशेष बाब म्हणजे या बॅचमधील बहुतांश विद्यार्थी विशेष पदावर असून प्रगतशील मार्गावर व्यवसाय नोकरी शेती मध्ये या घडीला उत्तम कामगिरी बजावत असल्याचे दिसून आले, या मिलनामध्ये सर्वांची हितगुज होऊन 25 वर्षानंतर भेटण्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नाव चैतन्य असून एकामेकाबद्दल अभिमान व सन्मान झटू लागला होता यामध्ये शिक्षकांनी या बॅचचे विशेष कौतुक करून सर्वांचे डोळे निरोप घेताना पानावलेले होते आयोजकांनी पुढील काही दिवसांनी पुन्हा आपण नक्की एकत्र येऊन अशी ग्वाही देत कार्यक्रमाची सांगता केली यामध्ये प्रास्ताविक मनीषा दारोकर,रोशनी दामले यांनी करून अध्यक्षीय भाषण माननीय अशोकरावजी बनसोड यांनी केले असून सुत्रसंचालन शुभांगी खुंटे, दिनेश अमझरे करून आभार प्रदर्शन सोनाली दाभाडे यांनी केले.