
भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी यवतमाळमध्ये तिरंगा बाईक रॅलीचे भव्य आयोजन!
वंचित बहुजन आघाडीच्या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
यवतमाळ:-श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवसाचं औचीत्य साधून,देशाच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असलेल्या भारतीय सैनिकांचे मनोबल वाढविण्याच्या उद्देशाने वंचित बहुजन आघाडी – यवतमाळ जिल्हा यांच्यावतीने आज दिनांक 10 मे (शनिवार) रोजी एक भव्य तिरंगा बाईक रॅली आयोजित करण्यात आली.
रॅलीने शहराच्या प्रमुख मार्गांवरून जिवंत संदेश दिला – देशासाठी बलिदान देणाऱ्यांचे आपण ऋणी आहोत!
हातात तिरंगा घेऊन "जयभीम – वंदे मातरम् – भारत माता की जय – छत्रपती शिवाजी महाराज की जय – वीर शहीद अमर राहो" अशा घोषणांनी शहर दणाणून गेले.
रॅलीचा मार्ग---
→ वंचित कार्यालय येथून सुरुवात होऊन → छत्रपती शिवाजी महाराज पुतळा → संविधान चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा → हुतात्मा चौकातील भगतसिंग-राजगुरू-सुखदेव स्मारक येथे पोहचली.त्याठिकाणी पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना व जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.तसेच भारतीय सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली.
या रॅलीचे नेतृत्व डॉ.नीरज वाघमारे (जिल्हाध्यक्ष,वंचित बहुजन आघाडी,यवतमाळ) यांनी केले.यावेळी उपस्थितांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. निरज वाघमारे,जिल्हा महासचिव- शिवदास कांबळे,उपाध्यक्ष विशाल पोले,पुष्पाताई शिरसाट- महिला महासचिव,जिल्हा सचिव- भारती सावते,शहर उपाध्यक्ष- विलास वाघमारे,शहर अध्यक्ष गजानन सावळे,महासचिव प्रमोद पाटील, कार्याध्यक्ष-प्रसेनजित भवरे,शहर महासचिव रत्नमाला कांबळे, उपाध्यक्ष -मीना रणीत,शहर कोषाध्यक्ष- उत्तमराव कांबळे, दीपक नगराळे,करुणा चौधरी, माया मस्के,शालू ताई शिरसाट,करुणा मुन,
बाबूलाल वाकोडे,अशोक मनवर,सुनील वाघमारे,अनिल गजभिये,गजानन कोकाट,सुधीर खोब्रागडे,संजय पानतावणे,गोलू सिरसाट,रवींद्र नगराळे,अंकुश वानखडे, शंकर देवकर, हितेश गेडाम, सुनील वाघमारे,स्वप्निल कोल्हे,सुबोध जोशी,गौतम रामटेके इत्यादी कार्यकर्ते हजर होते.तसेच
महिला आघाडी,युवा आघाडी, तालुका व शहरातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
डॉ.नीरज वाघमारे म्हणाले :
"देशासाठी लढणाऱ्या जवानांचा सन्मान करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे.देशप्रेमाचा खरा अर्थ त्यांच्या बलिदानाची जाणीव ठेवण्यात आहे."