लातूर रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल
लातूर रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल
भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लातूर रेल्वे स्थानकावर दहशतवादी हल्ल्याच्या मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं.
या रंगीत तालीमेमध्ये दोन दहशतवाद्यांनी प्रवाशांवर गोळीबार केल्याची नाट्यमय घटना दाखवण्यात आली. माहिती मिळताच लातूर पोलीस, एटीएस, बीडीएस, अग्निशामक दल, आरोग्य आणि महसूल विभाग तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
स्फोटकांची तपासणी, जखमींना तातडीची मदत, फॉरेन्सिक तपासणी आणि गर्दी नियंत्रण अशा सर्व कृतींचा सराव करण्यात आला.
ही मॉक ड्रिल पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये 240 पोलीस कर्मचारी आणि 43 अधिकारी सहभागी झाले.