logo

ऑल इंडिया मीडिया असोसिएशन न्यूज औंढा नागनाथ (हिंगोली) – सिद्धेश्वर सर्कल याचबरोबर, ज्या नागरिकांची नावे घरकुल योजनेत अद्याप आलेली नाहीत, तसेच नवीन पात्र लाभार्थ्यांचा देखील सर्वे करण्यात आलेला आहे.

ऑल इंडिया मीडिया असोसिएशन न्यूज औंढा नागनाथ (हिंगोली) – सिद्धेश्वर सर्कल याचबरोबर, ज्या नागरिकांची नावे घरकुल योजनेत अद्याप आलेली नाहीत, तसेच नवीन पात्र लाभार्थ्यांचा देखील सर्वे करण्यात आलेला आहे.

अशा नागरिकांना येत्या काळात घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

घरकुल योजनेतील अनेक लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाल्यानंतरही दुसरा हप्ता वेळेवर मिळालेला नाही, त्यामुळे अनेकांचे घरबांधणीचे काम अपूर्ण राहिले आहे.

ही समस्या गांभीर्याने घेत ग्रामविकास अधिकारी एन. आर. देशमुख यांनी स्वतः गावात दौरा करून घरोघरी जाऊन बांधकामाची पाहणी केली. त्यांनी लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व लवकरच त्या सोडवण्याचे आश्वासन दिले.

यावेळी गावातील जागरूक नागरिक शेख हाफीस जागीरदार, पवन कुमार, चंद्रभान ठोके यांनी देखील या सर्वेक्षणात सहभागी होत गावातील वस्तुस्थिती अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली.

लाभार्थ्यांनी पंचायत समितीकडे निवेदन देत लवकरात लवकर दुसरा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा करावा, अशी मागणी केली आहे, जेणेकरून अपूर्ण घरांचे काम वेळेत पूर्ण करता येईल.

याचबरोबर, ज्या नागरिकांची नावे घरकुल योजनेत अद्याप आलेली नाहीत, तसेच नवीन पात्र लाभार्थ्यांचा देखील सर्वे करण्यात आलेला आहे. अशा नागरिकांना येत्या काळात घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

- ऑल इंडिया मीडिया असोसिएशन न्यूज
-

52
3198 views