logo

पोलीस ठाणे वर्धा शहर डि.बी. पथकांची कारवाई,मोबाईल ॲपव्दारे फसवणुक करणारा आरोपी केला गजाआड…

सोन्याचे पैसे न देता सोने केले लंपास

पोलीस ठाणे वर्धा शहर येथे फिर्यादी नामे विपुल विलास करंडे वय 32 वर्ष रा. कपडा लाईन ता. जि. वर्धा यांनी तक्रार दिली कि, यातील आरोपी याने फिर्यादी यास कॉल करुण मला 10 ग्राम सोन्याचा गोप घ्यायचा आहे असे म्हणुन तुम्हाला ऑनलाईन ट्रान्सफर एन.ई.एफ.टि करतो तुम्ही मला अकाउंट डिटेल पाठवा असे म्हटले.

त्यावर फिर्यादी यांनी होय म्हणुन आरोपी यांनी मी उदया येवुन सोणे खरेदी करतो. असे म्हणुन दि. 20/03/2025 रोजी दुपारी 12/48 वा. दरम्यान यातील आरोपी हा व्हि.जे. के. ज्वेलर्स कपडा लाईन वर्धा येथे सोने खरेदी करणेस आला व त्याने 10 ग्राम चा 01 गोप पसंत केला त्याची एकुण किंमत 95000/रु. अशी झाली असता त्याने फिर्यादी यांचे अकाउंन्ट डिटेल्स घेवुन फियादी यांचे अकाउंन्ट वर 01 रुपये पाठवला तो 01 रु. फिर्यादी यांचे अकाउंन्ट ला आला.

त्यानंतर आरोपीने फिर्यादी यास बिल बनवायला सांगीतलेत्यानंतर आरोपीने त्याचे मोबाईल मध्ये काहितरी केले व नंतर त्याने त्याची एकुण 94,999/रु. चा ऑनलाईन ट्रान्सफर आर.टि.जि.एस. केल्याची पावती फिर्यादी यांला दाखवीले व आरोपी यांनी घाई घाईत लगेच 10 ग्राम सोण्याचा गोप घेवुन गेला. परंतु फिर्यादी हे हिशोब करायला बसले तेव्हा त्यांना लक्षात आले की सदर मालाचे पैसें अकाउंन्टला आले नाही

असे फिर्यादी यांचे लेखी तहरीर वरुण पो.ठाणे ला अप.क 724/2024 कलम 318(4),336 (3),340(2) BNS प्रमाणे गुन्हा नोंद करुण तपासावर असतांना यातील अनोळखी आरोपीचा पोलीस ठाणे वर्धा शहर येथील पो.उप. नी. शरद गायकवाड सोबत पोहवा प्रशांत वंजारी, पो.ना, नरेंद्र कांबळे, पो.शी. श्रावण पवार, पो.शी. वैभव जाधव, पो.शी. प्रशांत मुडे यांनी ठाणेदार पराग पोटे यांचे मार्गदर्शनात शोध घेतला असता नमुद गुन्हयातील आरोपी विशेष भारत धांडे वय 33 वर्ष रा. कळमणा नागपुर यास सापळा रचुन मोठ्या शिताफीने नागपुर येथुन ताब्यात घेवुन त्यास विचारपुस करुण त्याने सदरचा गुन्हा व पोलीस ठाणे वरोरा जि. चंद्रपुर येथील अप क्रमांक 158/2025 कलम 318 (1), BNS प्रमाणे गुन्हा केल्याचे कबुल केले.

व आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता असुण पुढील तपास सुरु आहे. नमुद आरोपी यास मा. कोर्टासमोर हजर करुण त्याचा पि.सी.आर. प्राप्त करुण पि.सी. आर. दरम्यान नमुद आरोपीचे ताब्यातुन 23.500 ग्राम सोणे रवा व त्याचा वापरता मोबाईल असा एकुण जुमला किंमत 2,34,065/- रु. चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक सा. अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक सा. मा. सागरकुमार कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सा. प्रमोद मकेश्वर, यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सा. पराग पोटे यांचे मार्गदर्शनात पो.उप.नी. शरद गायकवाड सोबत पोहवा प्रशांत वंजारी, पो.ना. नरेंद्र कांबळे, पो.शी. श्रावण पवार, पो.शी. वैभव जाधव, पो. शी. प्रशांत मुडे, व सायबर सेल वर्धा येथील पोहवा अक्षय राऊत, मपोशी स्मिता महाजन यांनी केली.

25
4789 views