logo

भाजपा सरकारच्या काळात धरणाच्या कामासाठी व नागरी सुविधांसाठी सातशे कोटी रुपये मंजूर, ४७८ कोटी रुपये विस्थापितांच्या वैयक्तिक लाभासाठी मंजूर..


मुखेड : मागील ३० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लेंडी आंतरराज्यीय प्रकल्पाचे अखेर घळभरणीचा शुभारंभ आ. डॉ. तुषार राठोड यांच्या शुभहस्ते तर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, जलसंधारण विभागाचे अध्यक्ष अभियंता अजय दाभाडे, लेंडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विवेकानंद तिडके यांच्या प्रमुख उपस्थितीत चोख पोलीस बंदोबस्तात आज दुपारी प्रकल्प पाळु या भागावर करण्यात आला. धरणाचे काम, पुनर्वसित गावठाणाचे काम व कालव्याच्या कामासाठी दहा वर्षात सातशे कोटी रुपये या सरकारच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आल्यानेच हा रखडलेला प्रधान सिंचन प्रकल्प मार्गी लागला आहे. भाजपाचे विद्यमान आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या शुभ हस्ते तर व जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जलसंधारण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लेंडी धरणावर घळ भरणीचा शुभारंभ झाल्यामुळे भाजपा शासनाच्या काळात लेंडी प्रकल्पाचा पाणी अडविण्याचा मुहूर्त झाला आहे. अखेर 39 वर्षांपासून प्रलंबित असलेला लेंडी प्रकल्पास घळभरणी बंदोबस्तात शुभारंभ झाल्यामुळे आगामी काळात मुखेड तालुक्यात सिंचन क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे अखेर स्पष्ट झाले आहे. या कार्यक्रमास नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपजिल्हाधिकारी अनुप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संकित गोसावी, तहसीलदार राजेश जाधव, लेंडी प्रकल्पाचे अधिकारी व विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार डॉ. तुषार राठोड यांनी सांगितले की, मुखेड तालुक्यातील गोणेगाव येथील आंतरराज्यीय लेंडी प्रकल्पास 1986 साली मंजुरी मिळाली, नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा देशाचे माजी गृहमंत्री तथा माजी मुख्यमंत्री जलक्रांतीचे प्रणेते शंकराव चव्हाण यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेऊन प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन केले होते. या प्रकल्पाचा घळभरणी कामाचा शुभारंभ 39 वर्षानंतर भाजपा महायुती शासनाच्या काळात होत आहे. या प्रकल्पातील विविध प्रलंबित प्रश्न भाजपा महायुतीच्या काळात आमदार डॉ. तुषार राठोड यांनी सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. इसवी सन 2012 साली या भागातील लेंडी प्रकल्पग्रस्तांनी 'आधी
पुनर्वसन, मग धरण' या धोरणातून तेरा वर्षे आंदोलन केले. या कालावधीत विविध प्रलंबित असलेल्या मागण्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आमदार म्हणून विजयी झाल्यानंतर विधानसभेत गेल्याबरोबर लेंडी प्रकल्पाचा प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेच्या अधिवेशनात आवाज उठवला होता. 27 हजार हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या लेंडी धरणाचा घळभरणी शुभारंभ माझ्यासारख्या सामान्य कार्यकत्यांच्या हस्ते होताना एक प्रदीर्घ स्वप्न साकार होताना अतिशय आनंद होत आहे. या भागातील नागरिकांचे प्रश्न, लेडी प्रकल्पाचे पुनर्वसनाचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझ्या दहा वर्षाच्या आमदारकीच्या काळात केला आहे मुक्रमाबाद भागातील पुनर्वसन व स्वेच्छा पुनर्वसना बाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करून मोठा निधी मिळवून दिला आहे. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, तत्कालीन जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत विविध बैठका घेऊन लेंडी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मुक्रमाबाद येथील नागरिकांना मावेजा मिळावा म्हणून 163 कोटी रुपयाचा निधी वितरित केला आहे. लेंडी प्रकल्प ग्रस्त गावात वाढीव कुटुंब झाल्यानंतर त्यांना निधी देण्यात यावा म्हणून राज्य शासनाकडे पाठपुरावा करून 3250 कुटुंबास 130 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. या भागातील नागरिकांना सानुग्रह अनुदान मिळावे म्हणून राज्य शासनाकडे पाठपुरावा करून सहा लाख 75 हजार रुपये प्रति हेक्टरी दराप्रमाणे 165 कोटी अकरा लाख रुपयाचा निधी मंजूर करून घेतला आहे. हा निधी लवकरच संबंधितांच्या

खात्यावर जमा होणार आहेत. लेंडी प्रकल्पातील उर्वरित प्रलंबित मागण्या लवकरच पूर्ण केल्या जाणार आहेत. लेडी प्रकल्पग्रस्त व प्रशासनाने समन्वयाची भूमिका घेतल्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागत आहे. राज्याचे मुख्यमंत्री मराठवाड्याचे शिल्पकार, जल नायक कै. शंकरराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून लेंडी प्रकल्पाचे भूमिपूजन झाले व तब्बल 39 वर्षानंतर भाजपा माहायुती शासनाच्या काळात माझ्या हस्ते घळभरणी कामाचा शुभारंभ करण्याचे भाग्य मला आपणा सर्वांच्या आशीर्वादामुळे प्राप्त झाले असेही आमदार डॉ. तुषार राठोड यांनी यावेळी सांगितले. यामुळे या भागातील नागरिकांना सिंचन क्षेत्राचा मोठा लाभ होणार आहे. या प्रकल्पामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन येणार आहे. लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्या बाबत व आव्हाना बाबत विद्यमान मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी मार्ग काढल्यामुळे या प्रकल्पाला आगामी काळात कोणतीही अडचण येणार नाही असे त्यांनी ग्वाही दिल्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागरिकांनी सहकार्यांची भूमिका घ्यावी व लेडी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन असल्याचे आमदार डॉ. तुषार राठोड यांनी सांगितले. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले की, लेंडी प्रकल्पग्रस्तांचे काम सुरू असताना नागरिकांनी समन्वयाची व सहकार्याची भूमिका ठेवावी व हा प्रकल्प पूर्ण होताना कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी बोलताना सांगितले की, लेंडी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या ज्या काही अपूर्ण मागण्या आहेत त्या प्रशासकीय पातळीवर सोडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगितले. विद्यमान आमदार डॉ. तुषार राठोड यांनी मागील दहा वर्षापासून केलेल्या पाठपुराव्याला अखेर गळभरणीच्या रूपाने मोठे यश मिळाल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले आहे.

विशेष पॅकेज मिळाले..

धरणासाठी लागणारया जमिनीचे संपादन 1994 ते 2006 च्या कालावधीमध्ये झाले. जमिनीचे दर 1994 -95 साली निश्चित केले गेले. व रक्कम 2004-2005 यावर्षी अदा करण्यात आली. दरम्यानच्या काळात रेडी रेकनर ला वाढलेल्या दरांचा विचार केला गेला नाही. अत्यल्प दरात धरण क्षेत्रातील जमिनीचे संपादन झाल्यामुळे व धरणाला विलंब झाल्यामुळे विशेष बाब म्हणून सानुग्रह अनुदान (पॅकेज) मंजूर करावी अशी मागणी आमदार तुषार राठोड यांनी वारंवार विधानसभेत केली. 2024 विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पंकेजला मंजुरी दिली. यासाठी 165 कोटी 11 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला. या निधीच्या नोटीस देण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. पहिल्या टप्यातील पाच गावांचा सानुग्रह अनुदान या महिन्याअखेर विस्थापितांच्या खात्यावर जमा होईल. हे धरण दोन टप्प्यात पूर्ण केले जाईल. यावर्षी पहिल्या टण्याची 40% घळभरणी पूर्ण करून पाच गावांचे पुनर्वसन होईल. यामध्ये रावणगाव, भाटापूर, हसनाळ पमु, मारजवाडी व भासवाडी या गावांचा समावेश आहे.

पोलीस बंदोबस्तात गळ भरणी

पोलीस बंदोबस्तात घळभरणी कार्यक्रम झाला आहे. या कार्यक्रमास जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे, लेंडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विवेक तिडके, माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड, लक्ष्मण पाटील खैरकेकर, संतोष बोनलेवाड, डॉ. रणजित काळे, अशोक गजलवाड, व्यंकटराव लोहबंदे, स. पो. नि. भालचंद्र तिडके, दत्ता पाटील मुधळे, बालाजी पाटील सकनुरकर, व्यंकटराव जाधव, हेमंत खंकरे, बालाजी पसरगे, धिरज पाटील, हाणमंतराव नरोटे, शेखर देशमुख, किशोरसिंह चव्हाण, शिवाडे राठोड, कपिल बनबरे, शिवराम हसनाळे, जलाल सम्यद आदी उपस्थित होते.

6
1342 views