logo

लेंडी आंतरराज्य प्रकल्पाच्या घळभरणीस सुरुवात....

लेंडी आंतरराज्य प्रकल्पाच्या घळभरणीस सुरुवात..!!
माझ्या मागील दहा वर्षाच्या प्रमाणिक प्रयत्नांना अखेर आज लाभला मुहूर्त..!!

मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातील गोणेगाव ता. मुखेड येथील अखेर 39 वर्षापासून प्रलंबित असलेले लेंडी आंतरराज्य प्रधान सिंचन प्रकल्पाच्या #घळभरणी_कामाचा_शुभारंभ आज मा डाँ तुषारजी राठोड साहेब यांचा हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा जलक्रांतीचे प्रणेते श्रद्धेय शंकररावजी चव्हाण यांच्या हस्ते इसवी सन 1986 मध्ये या लेंडी आंतरराज्य प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते.

इसवी सन 2012 साली या भागातील लेंडी आंतरराज्य प्रकल्पग्रस्तांनी आधी पुनर्वसन मग धरण या धोरणातून तब्बल तेरा वर्ष आंदोलन केले.

इसवी सन 2015 साली महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून गेल्याबरोबर पहिला लेंडी आंतरराज्य प्रकल्पाचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला.

मागील दहा वर्षाच्या काळात लेंडी धरणाच्या कामासाठी व नागरी सुविधांसाठी तब्बल 700 कोटी रुपये मंजूर करून आणले आणि विस्थापिताच्या वैयक्तिक लाभासाठी तब्बल 478 कोटी रुपये मंजूर करून आणले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार, अतिरिक्त पोलिस अधिक्षक सुरज गुरव, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसिलदार राजेश जाधव, पोलिस उपविभागीय अधिकारी संकेत गोसावी, सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके, लेंडी अधिक्षक अभियंता दाभाडे व लेंडी कार्यकारी अभियंता तिडके व प्रशासकीय आणि भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

31
6695 views