गॅस एजन्सी करत आहे ग्राहकांची आर्थिक लूट
उमरखेड : मौजा धानोरा (सा)
येथे नाथांजली गॅस एजन्सी ढाणकी यांच्याकडून गॅस पुरवठा केला जात आहे. एप्रिल महिन्याच्या किमतीनुसार घरगुती सिलेंडरची किंमत ८८६ एवढी असून नाथांजली गॅस एजन्सी द्वारे ग्राहकांना ९५० रुपयांना गॅस विकून ग्राहकांची ६०ते७० रुपयांनी आर्थिक लूट करत असल्याचा आरोप धानोरा येथील सामाजिक कार्यकर्ते केशवराव तिडके यांनी तहसीलदार उमरखेड व उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्यामार्फत जिल्हाधिकारी
यवतमाळ यांना लेखी स्वरुपात तक्रार केली आहे. गॅस एजन्सी व गॅस पुरवठा करणाऱ्या गाडीवरील ड्रायव्हरला विचारणा केली असता ड्रायव्हर उद्धट भाषेत बोलतो आणि गावातील आमचे सोयरे मोठ्या पदावर आहेत तुमचे ने काय होते ते करा अशीअरेरावी ची भाषा करत आहेत. त्यामुळे उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार यांनी या गोष्टीची चौकशी करून दोषी व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करावी. अन्यथा आपल्या कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा केशवराव तिडके यांनी दिला आहे.