logo

अवकाळी वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे झालेल्या केळी पिकाच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा. माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर

कनकवाडी आसनगाव सोपारा सातोना खुर्द शिवारातील झालेल्या नुकसानीची आमदार बबनराव लोणीकर यांनी तहसीलदार कृषी अधिकारी गटविकास अधिकारी यांच्यासह केली पाहणी.
परतूर (प्रतिनिधी) :-
भाऊसाहेब पाटील मुके -

दिनांक 05 रोजी सायंकाळच्या सुमारास परतुर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे केळी व फळबागांचे प्रचंड नुकसान झाले या पार्श्वभूमीवर परतुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी कनकवाडी, सोपारा, आसनगाव सातोना आदी भागात दौरा करून झालेल्या नुकसानीची पाहणी करत तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले
थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन लोणीकरांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करताना सांगितले की, अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांनी जिवापाड पोचलेल्या केळी पिकाचे व फळबागांचे प्रचंड नुकसान झालेले असून आपण याबाबतीत शासनाकडे पाठपुरावा करत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
पुढे ते म्हणाले की केंद्र व राज्यातील सरकार खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांच्या सुखदुःखामध्ये आपण नियमितपणे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
पुढे बोलताना ते म्हणाले की, शेतकरी आपली पिके जीवाच्या जतन सांभाळत असतो मात्र अशा प्रकारचे अस्मानी संकट आल्यानंतर हवालदील झालेल्या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी राज्य व केंद्र सरकार सर्व तो प्रयत्न करीत असते त्यामुळे आलेल्या या संकटामुळे खचून न जाता शेतकऱ्यांनी या संकटाचा हिमतीने सामना करावा अशी यावेळी बोलताना ते म्हणाले
पुढे ते म्हणाले की, आपण शेतकरी पुत्र असल्यामुळे आपल्याला शेतकऱ्यांच्या सगळ्या अडीअडचणी माहीत असून, अनेक वेळा आसमानी आता तोंडाशी आलेला घास हिरावून घेत असते मात्र अशा परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे असून प्रशासनाने तात्काळ झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत असे यावेळी आमदार लोणीकर यांनी सांगितले
या वेळी तहसीलदार डॉ प्रतिभा गोरे
.. कृषी अधिकारी श्री रोडगे तुकाराम सोळंके गजानन लोणीकर , निवृत्ती लाटे, शिवाजीराव लाटे, बंडू मानवतकर, भगवान आरडे
उमेश अर्जुन राठोड. अशोक गीताराम. दिगंबर भागवत वटाणे राजेश बाबुराव मीठे .अर्जुन सुंदरराव बापमारे .गणेशराव मिठे संतोष राठोड. विलास चव्हाण विष्णू बापू मिठे. आहे ला जी मिठे .विठ्ठलराव मिठे .मधुकर मिठे .पवन मिठे. प्रदीप मिठे सुग्रीव बापमारे. सुनील मिठे विनायक मीठे. भागवत कुरधने विष्णू बोबडे. तुकाराम शेळके सोपान मिठे. हरिभाऊ वटाणे भुजंग मीठे. सुनील मिठे. सुधाकर मिठे, माणिक राठोड गणेश राठोड छत्रपती थोरात, यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थिती होती

13
2296 views