logo

पोरला मराठी उच्च प्राथमिक शाळेत नवीन मुख्याध्यापिका पोर्णिमा उराडे यांचे उत्साहात स्वागत

गडचिरोली (प्रतिनिधी)
गडचिरोली जिल्ह्यातील पोरला मराठी उच्च प्राथमिक शाळेत आज नविन मुख्याध्यापिका पोर्णिमा उराडे मॅडम यांचे औपचारिक स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. या प्रसंगी पालक समिती अध्यक्ष श्री. रामकृष्णजी बोरुले यांनी त्यांना फुलांचे बुके देऊन त्यांचे स्वागत केले.

स्वागत समारंभात प्रभारी मुख्याध्यापिका रामगिरवार मॅडम, शिक्षकवृंद, कर्मचारीवर्ग उपस्थित होते. सर्वांनी मिळून पोर्णिमा उराडे मॅडम यांचे हार्दिक अभिनंदन केले व शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेच्या विविध उपक्रमांवर चर्चा करण्यात आली तसेच शाळेचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावण्यासाठी सामूहिक निर्धार व्यक्त करण्यात आला.

शाळेला नविन मुख्याध्यापिका मिळाल्यामुळे शाळेतील वातावरण आनंदमय झाले आहे. शिक्षणाचा दर्जा अधिक चांगला होईल, अशी आशा पालक समिती अध्यक्ष श्री. रामकृष्णजी बोरुले यांनी व्यक्त केले. शाळेच्या प्रगतीसाठी सर्व शिक्षकवर्ग व पालक एकत्र येऊन योगदान देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

148
2543 views