logo

सेतू केंद्रांमध्ये जास्तीचे पैसे घेतल्याच्या तक्रारी; चौकशीची मागणी

गडचिरोली (प्रतिनिधी): नागरिकांसाठी सुविधा म्हणून सुरू असलेल्या सेतू केंद्रांबाबत काही नागरिकांनी जास्तीचे पैसे घेतल्याच्या तक्रारी केल्या आहेत. अलीकडील प्रकरणात काही सेतू केंद्रांमध्ये कागदपत्रांसाठी निर्धारित शुल्कापेक्षा अधिक पैसे घेतल्याचे उघड झाले आहे.

विशेषतः स्टँप पेपर, जन्म प्रमाणपत्र, मालमत्ता दस्तऐवज यांसारख्या सेवा देताना अतिरिक्त शुल्क घेतल्याचे नागरिकांनी सांगितले. एका नागरिकाने सांगितले, “१०० रुपयांच्या स्टँप पेपरसाठी मी गेलो होतो, तेव्हा १२० रुपये मागितले गेले. विचारल्यावर प्रक्रिया शुल्क असल्याचे सांगण्यात आले.”

या बाबत काही नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ता नीलकंठ जी संदोरकर यांच्याशी संपर्क साधून ही समस्या मांडली. त्यानंतर नीलकंठजी संदोरकर यांनी संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधले आहे आणि नागरिकांना आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

कायद्याच्या नियमानुसार, स्टँप पेपर किमतीपेक्षा जास्त दराने विकणे हे गुन्हा आहे. नागरिकांनी अशी मागणी केली आहे की कोणत्याही सेतू केंद्रात जास्तीचे पैसे मागितल्यास पुरावे तयार करून योग्य ठिकाणी तक्रार दाखल करावी.

डिजिटल व्यवहार वाढत असतानाही अशा तक्रारी येत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी जनजागृती होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, “सरकारी सुविधा सर्वसामान्यांसाठी आहेत; त्यामुळे जास्तीचे पैसे मागणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.”

70
1297 views