logo

विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कामगार दिनी कामबंद आंदोलन केले

गंगापूर प्रतिनिधी मुन्ना भाई : राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी कामगार दिनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. ग्रामपंचायत कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यांनी गंगापूर पंचायत समितीसमोर कामबंद आंदोलन सुरु केले आहे.ल ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या हक्कापासून खूप दूर असल्याने राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचारी यांना न्याय देण्यात यावा अन्यथा बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे.

राज्यातील २७,९२० ग्रामपंचायतीमध्ये सफाई कामगार, पाणीपुरवठा कामगार, वीजपुरवठा कामगार, करवसुली कर्मचारी, लिपीक इत्यादी पदावर सेवेत आहेत. सुमारे ६० हजार ग्रामपंचायत कर्मचारी, अत्यल्प वेतनात काम करीत आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे. याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा आंदोलन, मेळावे, मोर्चे

काढले. मात्र प्रत्येकवेळी त्यांना फक्त आश्वासन मिळाले. मागण्यासंबधी अद्यापही निर्णय झालेला नाही.

ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना सुधारीत किमानवेतन लागू करावे. वसुलीची व उत्पन्नाची अट शासननिर्णयानुसार सरपंच, कार्यकारीमंडळ, ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यावर असून याची

पंचायत समिती गंगापूर सभागृह

राज्य

कामबंद आंदो

अंमलबजावणी मात्र असंघटीत ग्रामीण भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लादली आहे यामुळे कर्मचाऱ्यावर एक प्रकारे सरकार अन्याय करत आहे. शासनाने वेतनासाठी लादलेली वसुलीची व उत्पन्नाची अट तत्काळ रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.ग्रामपंचायत कामगार सेनेचे गंगापूर तालुकाध्यक्ष सोमिनाथ केरे, उपाध्यक्ष दत्ता बरडे, सचिव गणेश शेलार, जिल्हा संघटक राम थोरात, सदस्य सचिन तुपे, परमेश्वर थोरात, संजय जगताप, अजिम पठाण, अर्जुन मिसाळ, सुनील काळे, नाना पवार, शरीफ शहा, बाबासाहेब कान्हे, अंबादास दाणे, शंकर पुरी, बाळासाहेब नन्नवरे आदी उपस्थित होते.

0
77 views