logo

Maharashtra News Live Updates : रायगड जिल्ह्यात मनसैनिकांनी दिला परप्रांतीय तरुणाला चोप Maharashtra Breaking Live Marat

Maharashtra News Live Updates : रायगड जिल्ह्यात मनसैनिकांनी दिला परप्रांतीय तरुणाला चोप
Maharashtra Breaking Live Marathi Headlines 04th May 2025 : आज रविवार दिनांक ०४ मे २०२५, महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा, पहलगाम हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान तणाव, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, आयपीएल २०२५, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...नंदुरबार जिल्ह्यातून जाणारा नेत्रक शेवाळी राष्ट्रीय महामार्गावर विचित्र अपघात
महामार्गावर लोंबकळणाऱ्या वीज तारांच्या स्पर्शाने ट्रॉला चालकाचा मृत्यू.....

विजेच्या झटक्याने केबिनमध्ये बसलेल्या चालकाचा जळून झाला कोळसा....

महाराष्ट्र आणि गुजरात राज्यावरती सीमेवर असलेला आश्रवा गावातील घटना....

विजेच्या झटक्याने ट्रॉल आला बाहर न निघताना ड्रायव्हरचा होरपळून मृत्यू....

राष्ट्रीय महामार्गावरील विद्युत तारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर....नांदेडची जीवन वाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या गोदावरी नदीला जलपर्णीने घातला विळखा
गोदावरी नदीचे नाभी स्थान म्हणून नांदेड शहराची ओळख आहे. नांदेडची जीवन वाहिनी असणाऱ्या गोदावरी नदी घाटावर अनेक धार्मिक स्थळे आहेत.

जगप्रसिद्ध गुरुद्वारा देखील गोदावरी नदीच्या काठावर आहे. त्यामुळे या ठिकाणी देश, विदेशातील भावी नांदेडमध्ये येत असतात.

गोदाकाठी अनेक धार्मिक कार्यक्रम होत असतात. परंतु पवित्र समजल्या जाणाऱ्या या गोदावरी नदीला जलपर्णीने विळखा घातला आहे.

गोदावरी नदीच्या या काठावर अनेक पवित्र असे घाट आहेत. या संपूर्ण घाटावर जलपर्णी व्यापली आहे.

चार ते पाच मोठ्या नाल्याचं घाण पाणी देखील याच गोदावरी नदी पात्रात सोडण्यात येत. त्यामुळे गोदावरी नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे.

गोदावरी नदीचा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका यावर लाखो रुपयांचा खर्च करते. परंतु गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यास महापालिकेला सपशेल अपयश आल्याचे दिसून येत आहे.

गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यास महापालिका अपयशी ठरली असून महापालिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पर्यावरण प्रेमी डॉक्टर किरण शिल्लेवार यांनी केली आहे.

0
0 views