logo

छ.संभाजीनगरमधील लॉजबद्दल पोलिसांना मिळाली टीप, छापा टाकताच धक्कादायक माहिती समोर, दोघे ताब्यात छत्रपती संभाजीनगरच्या झा

छ.संभाजीनगरमधील लॉजबद्दल पोलिसांना मिळाली टीप, छापा टाकताच धक्कादायक माहिती समोर, दोघे ताब्यात
छत्रपती संभाजीनगरच्या झाल्टा फाटा येथे पोलिसांनी एका लॉजवर छापा टाकून अवैध देहविक्रीचा पर्दाफाश केला. या कारवाईत २४ वर्षीय बांगलादेशी तरुणी देहविक्री करताना आढळली, जी बनावट आधार कार्ड वापरून भारतात आली होती. पोलिसांनी तरुणी आणि अभिजीत जाधव नावाच्या तिच्या एका साथीदाराला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : शहरातील झाल्टा फाटा येथील लॉजवर अवैध देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी छाप टाकला. यावेळी २४ वर्षीय बांगलादेशी तरुणी देहविक्रीचा व्यवसाय करत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली. या प्रकरणी पोलिसांनी तरुणी व तिच्यासोबत असलेल्या एका साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत.झाल्टा फाटा येथील हॉटेलमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू

अभिजीत उर्फ राहुल बाळासाहेब जाधव राहणार तळेगाव घनसावंगी जालना ह.मु.झाल्टा फाटा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झाल्टा फाटा येथे एका हॉटेलमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक आरती जाधव यांनी सापळा रचलासंबंधित हॉटेलवर छापा टाकला असता या कारवाईत 24 वर्षीय बांगलादेशी तरुणी देहविक्री करत असल्याचे समोर आले. चौकशी केली असता संबंधित तरुणीही बांगलादेश येथील असल्याचे समोर आले. पोलिसांनी संबंधित तरुणीला भारतीय नागरिकत्वाबाबत विचारले असता तिच्याकडे बनावट आधार कार्ड आढळून आले आहे. दरम्यान परवानगी नसताना 24 वर्षे तरुणी बेकायदेशीरपणे बांगलादेशातून भारतात आली.

1
0 views