मनपात बदल्यांची प्रक्रिया सुरू ठाण मांडलेले कर्मचारी हलणार.....
उपायुक्तांनी कर्मचाऱ्यांची मागवली माहितीजळगाव : महापालिकेत अनेक वर्षांपासूनएकाच जागेवर ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची खुर्ची हलणार असून त्यादृष्टीने माहिती संकलित केली जात आहे. तीन वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. उपायुक्त निर्मला गायकवाड (सा. प्र.) यांनी प्रत्येक विभागाकडून तशी माहिती मागवली आहे. खोटी माहिती सादर केली तर संबंधितावर कठोर कारवाई केली जाणार आहे.मे महिना म्हटला म्हणजे सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा महिना मानला जातो. या काळात प्रशासकीय बदल्या होतात. त्यानंतर शक्य झाले तर विनंती बदल्यांचा विचार केला जातो. आता महापालिकेत प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अनेक विभागांमध्ये काहीई-ऑफीससाठी ४० संगणक खरेदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला १०० दिवसांचा आराखडा दिलेला आहे. राज्यशासनाच्या या उपक्रमांतर्गत महानगरपालिकेच्या ७३ सेवा ऑनलाइन करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी एका बँकेच्या मदतीने सॉफ्टवेअर तयार करण्यात येत असून महापालिकेच्या प्रशासकीय कामांसाठी ई-ऑफिस सुरू करण्यात येणार आहे. त्याकरिता मनपाच्या भांडार विभागाकडून जीएम पोर्टलवरून ४० संगणकाची खरेदी करण्यात आली असून हे संगणक जन्म मृत्यू नोंदणी विभाग, आस्थापना विभाग, दवाखाना विभाग, घरपट्टी विभागासह विविध विभागांना देण्यात येणार आहेत.मोजके कर्मचारी वर्षांनुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत. आता अशा सर्वांच्या बदल्या करण्याचा निर्णय आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी घेतला आहे.