
शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व विलासराव पाटील
शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व विलासराव पाटील
ज्ञानाने माणूस मोठा होतो, असे म्हटले जाते; मात्र त्या ज्ञानाला जर संस्कारांची जोड मिळाली तरच खरी माणुसकी आणि माणसातील माणूसपणाचा उजास प्रकट होतो. देवगांव देवळी हायस्कूलचे अध्यक्ष तात्यासो विलासराव पाटील हे या अमूल्य वाक्यांचे ज्वलंत उदाहरण आहेत.
धैर्य, अविरत मेहनत, सत्यता, कमालीची बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचा अखंड प्रवाह या सर्व गुणांवर त्यांचा प्रेमळ व निर्मळ स्वभाव, कोणत्याही परिस्थितीत आदरयुक्त, हसतमुख देखावा आणि प्रसन्न व्यक्तिमत्व हे परमेश्वराने त्यांना दिलेले अमूल्य भेटी आहेत. त्यांच्या या तेजस्वी व्यक्तिमत्वामुळे त्यांचा वर्चस्व मृत्यूपर्यंत चालणारा ज्ञानाचा प्रवाह अभिषिक्त झाला आहे.
तात्यासाहेब यांचा जन्म आणि कुटुंबीय संस्कार शैक्षणिक वातावरणात झाले. आई मंदाकिनी पाटील राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्या होत्या, यामुळे त्यांना शिस्त, निष्ठा आणि सेवा यांचे धडे लवकरच मिळाले. त्यांच्या वडील-आईच्या कठोर परंतु प्रेमळ मुल्यांनी तात्यासाहेबांचे जीवन घडले. वडील देवगाव देवळी हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष कै शांताराम बापू पाटील अत्यंत साधे व आदर्श शिक्षक होते त्यांनी सरांना शिक्षणाचे बाळकडू दिले.. पत्नी गृहिणी तर मुलगी फॅशन डिझायनर आहे.. एक आदर्श व मितभाषी असा परिवार आहे...
विलासराव पाटील यांनी २०११ मध्ये जनगणना अभियानात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्या यमुने स्वतंत्रपणे ओबीसींची जनगणना करणे आवश्यक, असे आग्रह धरून त्यांनी ओबीसी शिक्षक असोसिएशनचे राज्याध्यक्ष म्हणून जनजागृती केली, तसेच पंतप्रधानांना ५००० पोस्टकार्ड पाठवले. धुळे जिल्ह्यातील नंदुरबार जिल्हा वेगळा झाल्यानंतर त्यांनी एसटी बांधवांचे आरक्षण घटवून ओबीसींना १९% आरक्षण मिळावे, यासाठी कष्ट घेतले. त्यांच्या अथक प्रयत्नांना यशस्वी करत मोदी सरकारने कॅबिनेटमध्ये ओबीसी जनगणनेस मंजुरी दिली. या विजयाबद्दल त्यांनी सरकारचे हार्दिक अभिनंदन केले.
उच्च शिक्षणासाठी ओबीसी विद्यार्थ्यांना २७% आरक्षण जाहीर असतानाही, काही आरक्षणविरोधी लोकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. तसेच सर्वोच्च न्यायालयाने यावर स्थगिती दिली होती. यावरून ११ एप्रिल २००८ रोजी जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त त्यांनी आरक्षणाच्या समर्थनार्थ व्यापक सह्य संकलन मोहीम राबवून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळवून विद्यार्थ्यांना आरक्षण मिळाले.
अ.भा.माळी महासंघाच्या वतीने वधू-वर परिचय मेळावा, रक्तगट तपासणी शिबिरे, वृक्षारोपण तसेच थोर पुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्ताने व्याख्याने आयोजित करून त्यांनी सामाजिक बांधिलकीचे प्रतीक साकारले. धुळे जिल्हा परीक्षेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने २००९ मध्ये सुरु केलेल्या चुकीच्या बिंदू नामावलीवरील घोटाळा त्यांनी उघड केला. यामुळे दहा वर्षे बंद असलेली ओबीसी भरती पुन्हा संचालनात आली.
तात्यासाहेबांनी २८ नोव्हेंबर रोजी महात्मा ज्योतिराव फुले स्मृतिदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची मागणी केली. त्यानुसार खानदेशात गुणवंत शिक्षकांना गुरु गौरव पुरस्कार देऊन सतत सन्मानित केले जाते. २५०० हून अधिक शिक्षकांनी याचा लाभ घेतला.
उच्च शिक्षणासाठी ओबीसी महामंडळाकडून शैक्षणिक कर्ज उपलब्ध होण्याचे प्रोत्साहन त्यांनी दिले, ज्यामुळे महाराष्ट्रातील ७०० हून अधिक विद्यार्थ्यांना मदत झाली. अखिल भारतीय माळी महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष कै अँड संभाजी पगारे यांच्या निधनानंतर त्यांनी धुळे येथे शोकसभा आयोजित करून त्यांच्या योगदानांना उजाळा दिला.
तात्यासाहेबांनी महात्मा फुले यांना आदर्श मानले. देवगांव देवळी सारख्या छोट्या गावात शिक्षणासाठी सुविधा निर्माण करण्याचे स्वप्न त्यांनी साकारले. त्यांच्या प्रयत्नांनी महात्मा फुले नावाची दहावीपर्यंतची शाळा उभारून असंख्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या दालनात प्रवेश मिळवून दिला.
शाळेत तळागाळातील गुणवंत शिक्षकांना प्राधान्य देऊन नोकऱ्यांचा सन्मान दिला. महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल आज अमळनेर तालुक्यातील उपक्रमशील संस्था म्हणून ओळखली जाते. २५ वर्षांच्या श्रमाने शाळेला उच्च गुणवत्ता व प्रतिष्ठा मिळाली आहे. तिथल्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना दरवर्षी निरोप समारंभात मार्गदर्शन करण्याचा आदर ते कायम ठेवतात.
तात्यासाहेब विविध पदांवर कार्यरत असून, अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून समाज संघटन वाढवण्यास भर देतात. देवगांव देवळी येथे त्यांनी सावित्रीबाई फुले वाचनालय सुरू करून वाचनसंस्कृती जोपासली आहे. ओबीसी शिक्षक असोसिएशनचे ते राज्याध्यक्ष असून शिक्षक पतपेढीत संचालक आणि उपसभापती म्हणून देखील त्यांनी योगदान दिले आहे. त्यांनी नोकरी शिक्षकापासून सुरू केली तर मुख्याध्यापक पदावर सेवानिवृत्त झाले.. पदवीधर शिक्षक आमदारकीची निवडणूक सुद्धा त्यांनी लढवली..
अप्रतिम वक्तृत्व व सामाजिक नेतृत्व यामुळे त्यांनी अनेक विषयांवर प्रभावी व्याख्याने दिली आहेत.
**विलासराव पाटील यांचा ६० वा वाढदिवस – प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वासाठी हार्दिक शुभेच्छा**
माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात; काही चांगले, काही वाईट, काही लक्षात न राहणारे, तर काही कायमच्या मनात घर करणारे. अशी अनेक मनात घर करणारी माणसे जगतांना आपण लाभतो. अशी तुमची छाप आमच्या मनावर कायम रहावी, यासाठी या वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा!
— श्री ईश्वर आर महाजन (पत्रकार)
उपशिक्षक-
महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल, देवगांव, अमळनेर
मोबाईल: ९८६०३५२९६०