logo

दोडामार्ग तालुक्यात "पुष्पा"जन्म घेतोय

दोडामार्ग तालुक्यातील हिंदुत्ववादी युवकांना गाडीत कत्तली साठी गुरे नेत आहेत असा संशय असल्यामुळे त्या गाडीचा पाठलाग केला, मात्र यातून एक वेगळे आणि धक्कादायक सत्य उजेडात आले. दोडामार्ग तालुक्यासह गोवा वनविभागाला हादरवून सोडणारा "पुष्पा" यानिमित्ताने वनविभागाच्या ताब्यात आला. यात दोडामार्ग तालुक्यातील सर्वपक्षीय नेते तथा हिंदुत्ववादी युवकांची भूमिका मोलाची ठरली. मात्र एवढे होऊनही वनविभाग अजूनही गांधारीच्या भूमिकेत का? हा प्रश्न मात्र तालुका वासियांना सतावतो आहे. साधारणतः पाच ते दहा लाख रुपयांची खैर प्रकारची झाडे तसेच त्यासाठी वाहतूक केला जाणारा पिकअप टेम्पो यावेळी जप्त करण्यात आला. पण तालुक्यातील वन विभागाच्या मर्जीमुळे जन्मात येत असलेला "पुष्पा" अर्थात संदेश नाईक (रा. तळवडे)आणि त्याच्या इतर मुस्लिम साथीदारांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मणेरी येथे एका उर्दू अक्षरांनी बोर्ड लावलेल्या गाडीत गुर असल्याचा सुगावा हिंदुत्ववादी युवकांना आलालागला त्यांनी सदर गाडीचा शोधून काढली असता ती गाडी मणे री कुबलवाडी तसेच मनेरी कलम ठाणा याच्या मध्ये असलेल्या एका कच्च्या रस्त्यावर मिळाली, या युवकांनी शिताफीने ही गाडी पकडून त्यातील संदेश नाईक (तळवडे) त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर असलेले इतर दोन मुस्लिम युवक यांना येथेच्छ चोप देत त्यांच्या व्यवसायाविषयी विचारणा केली असता आपण कोणताही गैरव्यवसाय करत नाही पास असलेल्या खैर झाडाची लाकडं आपण विकत असल्याचे त्या युवकांचे म्हणणे होते, मात्र त्याच्या बोलण्याचा संशय आल्यामुळे थोडे आणखीन खडसावून विचारले असता आपण खैर झाडाची लाकडं विकतो त्यात गैर काय असा पवित्रा या युवकांनी घेतला त्यावेळी ठिकाणी उपस्थित असलेले भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस तसेच सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण गवस, दोडामार्ग नगरपंचायत नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस तथा खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर, हिंदुत्ववादी संघटनेचे विविध पदाधिकारी यांनी त्यांना आपला इंगा दाखवताच तो युवक बोलता झाला व आपण खैर या झाडाची मोठ्या प्रमाणात तस्करी करतो असे सांगितले, तसेच ज्या ठिकाणी ही खैर झाडाची लाकडं एकत्रित केली जातात ती मणेरी येथील एका मुस्लिम धर्मियाची जागाही त्याने नेऊन दाखवली त्या ठिकाणी पाहिले असता अनेक खैर झाडाची लाकडं तोडलेली आढळली तसेच काही लाकडे तासून त्या ठिकाणाहून नेल्यामुळे त्याची साल मोठ्या प्रमाणात घटना स्थळावर दिसत होती यावरून खैरी या वृक्षाची या ठिकाणाहून मोठी अवैधरित्या विक्री होत असल्याचे समोर आले. या ठिकाणची जागा सदर उपस्थित पदाधिकारी व युवकांनी वनविभागाला दाखवली यावेळी या ठिकाणी आपण एकदा कारवाई केल्याचे वनविभागाने म्हटले आहे मात्र सततचे वनविभागाचे दुर्लक्ष या ठिकाणी दोडामार्ग साठी मारक ठरत असून संदेश नाईक नामक एक तस्कर या ठिकाणी जन्मास येतं आहे.

सदर संदेशनाईक हा मूळ तळवडे येथील युवक असून तो मोठ्या प्रमाणात खैर झाडाची तस्करी करत असल्याचे वन विभागाकडून समजते आहे तसेच त्याने गोव्यातही वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून त्या ठिकाणाहूनही अशाच प्रकारची तस्करी केल्याचे समोर येत आहे. त्याच्या मोबाईल मध्ये काही व्हिडिओ तसेच बंदुकीचे फोटो आढळून आल्यामुळे संदेश नाईक हा युवक नक्की कोणता व्यवसाय करतो असा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे त्याच्यावर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी उपस्थितांनी केली.

👉 *संदेश नाईक याचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे*

दोडामार्ग बांदा राज्य मार्गावर मणेरी कलम ठाणे या ठिकाणी संदेश नाईक या युवकाची नर्सरी आहे, आजपर्यंत एक अतिशय संयमशील युवक म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते मात्र आजच्या खैर झाडांच्या तस्करीमध्ये त्याचा असलेला मोठा सहभाग तसेच त्याच्या मोबाईल मध्ये असलेले विविध व्हिडिओ आणि फोटो हे संशयाला जागा निर्माण करत असून दोडामार्ग तालुक्यात संदेश नाईक हा युवक नर्सरीच्या व्यवसाया आडून नेमके कोणते धंदे करतो याविषयी मात्र उपस्थितांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. तसेच त्याच्यासोबत अनेक मुस्लिम युवक असल्यामुळे या खैर झाडाच्या तस्करी बरोबर गुरे तसेच अन्य अमली पदार्थांची तस्करी तर करत नाही ना?असा सवाल मात्र या ठिकाणी विचारला जात होता.

👉 *वनविभागाची गांधारी ची भूमिका धोकादायक*
तालुक्यात वनविभागाचे कोणाच्याही हालचाली वर लक्ष नाही या ठिकाणी वनतोड तसेच अनेक प्रकारचे अवैध धंदे तसेच अवैध शिकार सुरू असते मात्र याला वनविभागाचे आशीर्वाद तसेच वनविभाग हा गांधारीच्या भूमिकेत असल्यामुळे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात खैर झाडाची अवैध तस्करी समोर आली. यावेळीही वनविभाग याकडे गांभीर्याने पाहत नसल्यामुळे तसेच कोणत्याही गोष्टीला "हत्ती" हे ठेवणीतले उत्तर देत असल्यामुळे वनविभागा विषयी ग्रामस्थात रोष असून या अवैध धंद्यावर वनविभाग व पोलीस यांनी मिळून कारवाई करणे गरजेचे बनले आहे.

👉👉 *अन्यथा वनविभागाचे डोळे उघडावे लागतील : चेतन चव्हाण*
दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत, आज मणेरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खैरसाठा जप्त करण्यात आला. यातून वनविभागाचे कोणत्याही अवैध गोष्टीवर नियंत्रण नाही अवैध धंदे सुरू असताना सुद्धा वनविभागाची गांधारीची भूमिका दोडामार्ग तालुक्यासाठी मारक ठरत आहे. यातून आता तरी त्यांनी हि भुमिका सोडावी अन्यथा त्यांचे डोळे आम्हाला उघडावे लागतील, आजचा हा प्रकार अतिशय निंदनीय असून मुस्लिम धर्मीयांना हाताशी धरून गुरे तसेच खैरसारख्या झाडाची तस्करी केली जाते याची योग्य ती चौकशी पोलीस प्रशासन तसेच वनविभागाने करावी अशी मागणी यावेळी दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केली त्यांच्यासोबत सरपंच सेवा संघटनेचे अध्यक्ष प्रवीण गवस, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस, खोक्रल सरपंच देवा शेटकर यांसह अनेक हिंदू तसेच गोरक्षक युवक उपस्थित होते.

2
119 views