
गंगापुर शहरात आठवडी बाजारात गरिबांच्या फ्रीजची होतेय जोरात विक्री...
(कारागिरांच्या हाताला मोठ्या प्रमाणात काम)
गंगापूर (प्रतिनिधी)
: शहरांमध्ये ऐन उन्हाळ्यात मातीचे माठ तयार करणारे उद्योग सुरू आहे. नागरिकाकडून मोठ्या प्रमाणे मागणी होत असल्याने सध्या आवक मोठेपणी आठवडे बाजारसह बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी व्यावसायिकांना मालाची विक्रीसाठी उपलब्ध करण्याचे काम चालू आहे.
यंदाच्या वर्षी उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असल्यानं गरिबांचं फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माठांना बाजारात मागणीही तेवढीच वाढली आहे. यामुळं माठ विक्री व्यावसायिकांना यंदाच्या वर्षी तरी काहीसा दिलासा मिळणार असल्याचं चित्र सध्या गंगापूर शहरांमध्ये व तालुक्यातील अनेक भागांमध्ये पाहायला मिळत आहे. शहरातील कारागिरांच्या ऐन उन्हाळ्यात मातीचे माठ तयार
करण्याचा तयार करण्याचा व्यवसाय सुरू आहे. कारण मागणी मोठ्या प्रमाणे होत आहे. मात्र सध्या आठवडे बाजारसह बाजारपेठेतील मागणीनुसार पुरवठा केला जातो आहे. व्यावसायिकांना मालाची विक्री सहज करता येत आहे. यामुळे गरिबांचा फ्रीज यंदा ग्राहकांसोबतच माठ घडविणाऱ्या व्यावसायिकांच्या पोटाला थंडावा देत आहे.
उन्हाळ्यात मातीच्या माठातील थंड व चवदार पाणी पिण्याची अनेकांना आस असते. यासाठी गंगापूर शहरांसह ग्रामीण भागात बहुतांशी घरी दरवर्षी नवे माठ, रांजण आदी खरेदी केले जातात. हे मातीचे माठ फ्रीजमधील थंडगार पाण्याप्रमाणे गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीयांची तहान भागविण्याचे काम करतात. गंगापूर शहरातील प्रसिद्ध कुंभार व्यावसायिक आजही पारंपरिक पद्धतीने मातीपासून मोठ्या प्रमाणात माठ, रांजण तसंच इतर वस्तू बनवतात. काहीजण लाकडी चाकांऐवजी सध्या जुने पद्धतीने अत्याधुनिक सुविधा कुंभारी चाकाचा वापर करून माठ बनविताना दिसून आहेत. हे माठ गंगापूरसह छत्रपती संभाजीनगर, नेवासा, वैजापूर लासुर स्टेशन आदी ठिकाणी भरणाऱ्या आठवडे बाजारात विक्रीसाठी पाठवतात.