logo

पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडलं – जैन समाजाचा निषेध, मंदिर पुनर्बांधणीची मागणी



सातारा (म्हसवड ता. माण ):प्रतिनिधी
मुंबईच्या विलेपार्ले पूर्व, कांबलवाडी परिसरात १६ एप्रिल रोजी सकाळी ९.१५ वाजता बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) द्वारे २६ वर्षे जुने श्री १००८ भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर अचानकपणे पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आले. या घटनेनंतर जैन समाजात तीव्र संतापाची लाट पसरली असून, देशभरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.

या संदर्भात श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट, म्हसवड येथून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व जैन समाजाच्या श्रद्धास्थानी झालेल्या या अन्यायाचे प्रायश्चित्त म्हणून मंदिर पुन्हा राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्याने उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनातील मुख्य मुद्दे :

२६ वर्षे जुने मंदिर अचानकपणे, कोणतीही पूर्वसूचना न देता, पोलीस बळाचा वापर करून पाडले गेले.
या कृतीमुळे जैन धर्मियांच्या भावना खोलवर दुखावल्या गेल्या.
संबंधित BMC अधिकाऱ्यांना त्यांच्या सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी.
राज्य शासनाच्या मदतीने मंदिर पुन्हा उभारण्याची विनंती.

या निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित पवार, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे, गृह मंत्रालय व ग्रामविकास मंत्री मा. श्री. जयकुमार गोरे यांना देखील पाठवण्यात आली आहे.

जैन समाज आणि सर्वधर्मीय नागरिकांकडून या मुद्द्यावर शासनाने तात्काळ कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




44
2877 views