logo

सप्तशृंगी आनंद आश्रम नांदुरीच्या संचालिका सरिताताई पगार यांचा कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनच्या वतीने सत्कार. बागल

सप्तशृंगी आनंद आश्रम नांदुरीच्या संचालिका सरिताताई पगार यांचा कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनच्या वतीने सत्कार.
बागलाण टीमच्या वतीने सप्तशृंगी आनंद आश्रमच्या संचालिका सौ सरिताताई पगार यांचा निराधारांसाठी करीत असलेल्या कार्याचा गौरव म्हणून दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनच्या बागलाण महिला अध्यक्ष , वैशालीताई सोनवणे, प्रियंका सोनवणे, सुवर्णा जंगम, तेजस पवार, स्वाती सोनवणे, सावली नीलेश सोनवणे,नीलम वैभव सोनवणे राजवर्धन विजय सोनवणे, यांनी कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनच्या वतीने, महिला दिनाचे सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान केला, तसेच सौ सुवर्णाताई जंगम यांनी तेथील निराधार तरुणांना कॅप, खेळण्यातील मोबाईल बालिकांना सुंदर पर्स, साड्यांची भेट दिली, 3100 ची देणगी दिली, प्रियंका सोनवणे यांनी 1000 रुपयांची देणगी दिली, तेजस पवार, राजवर्धन सोनवणे, नीलम सोनवणे सावली सोनवणे यांनी तेथील निराधार बालकांना शालेय दप्तरांची भेट दिली,वैशाली सोनवणे स्वाती सोनवणे, यांनी तेथील निराधारांना कपडे व साड्यांची भेट दिली. यावेळी निराधारांना गोड पुरणपोळीचे जेवणं दिले. श्री व सौ पगार यांना KPM मध्ये सामील केले

21
2155 views