logo

सावित्री कलयुगातील या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

यू ट्यूब वेब सिनेमा पासून अभिनयाला सुरुवात केली,वेब सिरीज केली, वेब सिनेमा तलाश द किलर ने कराटे मास्टर नानासाहेब बच्छाव यांना खलनायक म्हणून ओळख करून दिली.या वेब सिनेमा ने नान जी भाई यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
त्या नंतर नान जी भाई नी आता रुपेरी पडद्यावर अभिनया सह निर्मिती मध्ये ही यशस्वी पाऊल टाकले. सावित्री कलयुगाची हा मराठी चित्रपट जय मल्हार एंटर टेनमेंट व sp प्रॉडक्शन ने निर्मित केला असून बाबू भाई ही व्यक्ती रेखा डॉन च्या मुलाची भूमिका नाना नी केली आहे.
तर प्यारेलाल शर्मा यांनी दिग्दर्शन केलं आहे.
मराठी व हिंदीतील नामवंत कलाकार जयराज नायर हे डॉन च्या भूमिकेत आहेत. सर्व टीम ने काम मस्त केलं आहे.
कलाकार: पवन,महक,श्वेता भामरे, नाना बच्छाव, जयराज नायर, रवी कुमार, अविनाश मोरे, किरण ब्राह्मणे तसेच रेखा महाजन व सुखदा महाजन यांनी आपल्या गोड आवाजाने गाणी गायली आहेत
येत्या सहा जून 2025 ला वट सावित्री पौर्णिमेला प्रदर्शित केला जाणार आहे. सर्वांचे प्रेम,आशीर्वाद,शुभेच्छा आवश्यक आहे.
आपलाच नाना कराटे,नाना बच्छाव नाना भाई

92
6328 views